कोल्हापूर : येथील डी. आर. के. कॉलेजमध्ये आयोजित ‘एआय’ कार्यशाळेचे उद्घाटन करताना मुख्य मार्गदर्शक डॉ. अमेय पांगारकर.  
कोल्हापूर

kolhapur | ओघवत्या मराठीत घडली ‘एआय’ची सफर

दैनिक ‘पुढारी’ व ‘SyncAI’ आयोजित कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) हे भविष्यातील केवळ एक साधन नसून, ती प्रगतीची नवी भाषा आहे. ज्याला ही भाषा अवगत असेल, तोच उद्याच्या स्पर्धेत टिकून राहील, असा संदेश एआय तज्ज्ञ डॉ. अमेय पांगारकर यांनी दिला. दैनिक ‘पुढारी’ आणि ‘SyncAI' यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘एआय आणि प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग’ या विशेष कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. येथील देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स (डी.आर.के.) च्या सभागृहात ही कार्यशाळा झाली.

डॉ. विश्वनाथ मगदूम, डॉ. वर्षा मैंदर्गी, राहुल शिंगणापूरकर व ‘एआय’ वर्कशॉपमधील सहभागी प्रशिक्षणार्थी.

या कार्यशाळेत विद्यार्थी, गृहिणी, नोकरदार आणि व्यावसायिक अशा सर्व वयोगटांतील 110 प्रशिक्षणार्थिंनी उत्साहाने सहभाग घेतला. 16 वर्षांच्या तरुणांपासून ते 60 वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत सर्वजण ‘एआय’च्या किमया शिकण्यात दंग झाले होते.

उद्घाटनप्रसंगी संस्थेचे सचिव डॉ. विश्वनाथ मगदूम, कॉलेजच्या प्राचार्या डॉ. वर्षा मैंदर्गी, दैनिक ‘पुढारी’चे सिनिअर इव्हेंट मॅनेजर राहुल शिंगणापूरकर आणि मुख्य मार्गदर्शक डॉ. अमेय पांगारकर उपस्थित होते.

प्रमाणपत्र आणि ‘एआयचा बटवा’

सहभागी झालेल्या प्रत्येक प्रशिक्षणार्थीला डॉ. पांगारकर यांचे गाजलेले पुस्तक ‘AI च्या बटव्यातून’ आणि अधिकृत प्रमाणपत्र देण्यात आले. प्रश्नोत्तर सत्रात प्रशिक्षणार्थींच्या शंकांचे निरसन करण्यात आले.

जटिल तंत्रज्ञान सोप्या मराठीत

डॉ. अमेय पांगारकर आणि प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग तज्ज्ञ प्रसाद कुलकर्णी यांनी अत्यंत ओघवत्या आणि साध्या मराठी भाषेत गुंतागुंतीचे तंत्रज्ञान उलगडून दाखवले. ‘प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग’ म्हणजे काय, चॅट जीपीटीसारख्या साधनांचा वापर करून तासन्तास घालवावे लागणारे काम मिनिटांत कसे करावे आणि कंटेंट क्रिएशनमध्ये ‘एआय’ची मदत कशी घ्यावी, याची त्यांनी लाईव्ह प्रात्यक्षिके दिली. सायबर सुरक्षेच्या बाबतीत कोणती खबरदारी घ्यावी, यावरही त्यांनी विशेष प्रकाश टाकला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT