kolhapur | कॉलेजला न सोडल्याच्या रागातून अभियांत्रिकी विद्यार्थ्याने जीवन संपविले 
कोल्हापूर

kolhapur | कॉलेजला न सोडल्याच्या रागातून अभियांत्रिकी विद्यार्थ्याने जीवन संपविले

लक्षतीर्थ वसाहत येथील घटना; शहरात हळहळ

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कॉलेजमध्ये जाण्यासाठी वडील, भाऊ थांबले नाहीत, या नैराश्यातून शहरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्याने राहत्या घरात छताच्या फॅनला इलेक्ट्रिकल वायरने गळफास घेऊन जीवन संपविले. साईराज पांडुरंग हुंबे (वय 19, रा. आयडियल कॉलनी, लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर) असे तरुणाचे नाव आहे. तरुणाने नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलल्याने कुटुंबीयांसह नातेवाईकांना धक्का बसला. सोमवारी सकाळी ही घटना घडली.

लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. पोलिस सूत्राकडून सांगण्यात आले की, खासगी फर्म, व्यावसायिकांकडे बागकाम करणारे पांडुरंग हुंबे लक्षतीर्थ वसाहतीत राहतात. आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही त्यांनी दोन मुले व मुलीच्या शिक्षणावर भर दिला आहे. साईराज हा त्यांचा तीन नंबरचा मुलगा. साईराज शहरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT