kolhapur | पाटोळेवाडीत सहाव्या मजल्यावरून उडी घेत इंजिनिअरने जीवन संपवले 
कोल्हापूर

kolhapur | पाटोळेवाडीत सहाव्या मजल्यावरून उडी घेत इंजिनिअरने जीवन संपवले

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कदमवाडी, पाटोळेवाडी परिसरात लांबोरे हौसिंग सोसायटीत राहणार्‍या श्रीकांत सूर्यकांत काटकर (वय 33) या तरुण इंजिनिअरने सिद्धी हेरिटेज हौसिंग सोसायटी निवासी संकुलातील सहाव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. बुधवारी दुपारी दोन वाजता ही घटना घडली. आत्महत्येचे कारण रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते.

वन खात्यातील निवृत्त अधिकारी सूर्यकांत काटकर यांचा श्रीकांत हा मुलगा. त्याचा दीड वर्षापूर्वी विवाह झाला होता. घरी सूर्यकांत यांच्यासह मुलगा श्रीकांत, सून असे कुटुंब राहत होते. श्रीकांत काही दिवसांपासून तणावात होता. घरापासून काही अंतरावर असलेल्या सिद्धी हेरिटेज हौसिंग सोसायटी निवासी संकुलातील सहाव्या मजल्यावरील टेरेसवरून श्रीकांतने उडी टाकली. सुमारे 70 ते 75 फूट उंचीवरून उडी टाकल्याने रस्त्यावर पडून तो जागीच गतप्राण झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या श्रीकांतला नागरिकांनी तत्काळ शासकीय रुग्णालयात हलवले. मात्र, उपचारांपूर्वी मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT