कोल्हापूर : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकामार्फत गुुरुवारी बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड व रंकाळा टॉवर परिसरात कारवाई करण्यात आली. या कारवाईत 4 हातगाड्या, 8 स्टँड बोर्ड व एका केबिनवर कारवाई करून जप्त करण्यात आले.
गोखले कॉलेज ते संभाजीनगर या मुख्य रस्त्यावरील 15 डिजिटल बोर्डवर कारवाई करून ते जप्त करण्यात आले. ही कारवाई प्रशासक के. मंजुलक्ष्मी, शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलन अधीक्षक विलास साळोखे, सहायक अधीक्षक प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपिक सजन नागलोत, मुकादम रवींद्र कांबळे व कर्मचार्यांमार्फत करण्यात आली.