Gokul Election | १ हजार ४७७ दूध संस्‍थांवर अपात्रतेची टांगती तलवार! 
कोल्हापूर

Gokul Election | १ हजार ४७७ दूध संस्‍थांवर अपात्रतेची टांगती तलवार!

काही संस्‍थांचे भवितव्‍य न्‍यायप्रविष्‍ठ; काहींचे निर्णय अधिकार्‍यांच्‍या हाती

पुढारी वृत्तसेवा

कोल्‍हापूर : गोकुळच्‍या अवसायनातील ६४४ दूध संस्‍था वगळता आणखी १४७७ दूध संस्‍थांवर अपात्रतेची टांगती तलवार राहणार आहे. काही संस्‍थांचे भवितव्‍य न्‍यायप्रविष्‍ठ आहे, तर काहींचे निर्णय अधिकार्‍यांच्‍या हातामध्‍ये आहेत. न्‍यायालयाचा निकाल व अधिकार्‍यांच्‍या भूमिकेकडे दूध संस्‍था प्रतिनिधींचे लक्ष लागून राहिले आहे.

गोकुळची निवडणुकीसाठीची प्रारूप यादी लवकरच विभागीय उपनिबंधकांकडे सादर केली जाईल. ४८४४ संस्‍थांची यादी पाठविली जाणार असली, तरी यामधील सुमारे १४७७ संस्‍थांचे भवितव्‍य अधांतरीच आहे.

४१० संस्‍थांवरून राजकारण

गोकुळ प्रशासकांनी ४१० दूध संस्‍थांना सभासदत्व रद्द करण्‍याबाबत नोटीस बजावली आहे. ४१० संस्‍थांनी शनिवारी गोकुळच्‍या ताराबाई पार्क कार्यालयाच्‍या दारात ठिय्‍या मारला. नोटीस रद्द करण्‍याच्‍या मागणीवरून संस्‍था आक्रमक झाल्‍या. गोकुळचे शांत झालेले राजकारण या ४१० दूध संस्‍थांवरून पुन्‍हा तापले आहे.

महायुतीमधील अंतर्गत धुसफूस उघड

गोकुळची निवडणूक महायुती म्‍हणून एकत्र लढणार असे ठामपणे सांगितले जात असले, तरी ४१० दूध संस्‍थांवरून महायुतीमधील अंतर्गत धुसफूस उघड झाली आहे. महायुती म्‍हणून एकत्र असल्‍याचे दाखविले जात असले, तरी नेत्‍यांमधील अंतर्गत दुरावा निवडणुकीवर परिणाम करणारा ठरणार आहे.

दूध संस्‍थांचे निर्णयाकडे लक्ष

गोकुळकडे २०२१ नंतर नोंदणी झालेल्‍या ८०० संस्‍थांची माहिती त्रिसदस्‍यीय समितीचे अध्‍यक्ष कृष्‍णा ठाकरे यांनी मागविली आहे. ४१० दूध संस्‍थांचे सभासदत्व रद्द करण्‍याचा प्रश्‍न न्‍यायालयात आहे. तत्‍कालीन सहायक निबंधक सुजय कदम यांनी निकाल दिलेल्‍या २६७ संस्‍थांची सुनावणी सहनिबंधक प्रज्ञा तायडे यांच्‍यासमाेर सुरू आहे. या संस्‍थांबाबत निर्णय झाला नसल्‍याने अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्‍यामुळे या दूध संस्‍था प्रतिनिधींचे निर्णयाकडे लक्ष लागून राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT