पणजी : गोवा आणि सिंधुदुर्गात वावरणाऱ्या हत्तींसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील घाटकरवाडी या गावात हत्ती छावणी (हत्तीग्राम) स्थापन करण्यासाठी महाराष्ट्राचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), नागपूर यांनी सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे, अशी माहिती वन विभागाने उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर येथील सर्किट बेंचला दिली आहे. हा प्रस्ताव 27 ऑक्टोबर 2025 रोजी पाठवला असून, या नियोजित हत्तीग्रामची स्थापना होण्यासाठी सुमारे 4 वर्षे लागू शकतात, असेही वन विभागाने न्यायालयाला सांगितले आहे.
गोवा-सिंधुदुर्गात वावरत असलेल्या ओंकार हत्तीला पकडू नये, अशी याचिका न्यायालयात दाखल होती. त्यावर वन विभागाने आपले म्हणणे मांडले.