ZP President selection | जि.प. अध्यक्ष निवड 17 मार्चला होणार Pudhari File Photo
कोल्हापूर

ZP President selection | जि.प. अध्यक्ष निवड 17 मार्चला होणार

पंचायत समिती सभापती, उपसभापती निवडी 10 मार्चला

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कमी सदस्यसंख्या असतानाही भाजपने अध्यक्षपदावर दावा सांगण्यास सुरुवात केल्याने महायुतीमधील वातावरण तापले असतानाच संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती निवडीचा मुहूर्त अखेर ठरला. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी 17 मार्च रोजी दुपारी 2 वाजता जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा बोलविण्यात आली आहे.

अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली या सभेत निवड होणार आहे. पं.स. सभापती, उपसभापतीपदाची निवड 9 मार्च रोजी दुपारी 2 वाजता होणार आहे. यामुळे पदाधिकारी निवडीच्या हालचाली आता गतिमान होणार आहेत. चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका अतिशय चुरशीने लढल्या गेल्या. नेत्यांनी देखील ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. महायुती आणि महाविकास आघाडीतील बहुतांश राजकीय पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढविल्या. काही ठिकाणी सोयीच्या आघाड्या करण्यात आल्या.

जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाल्यामुळे अध्यक्षपदावर राष्ट्रवादीचा दावा स्वाभाविक आहे. त्यानंतर सदस्यांची नोंदणी करण्यात आल्यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. राष्ट्रवादीने अध्यक्षपदावर दावा सांगताच कमी सदस्यसंख्या असतानाही भाजपने स्थानिक आघाड्यांचा आधार घेत सदस्य मसंख्या आमच्याकडेच अधिक असल्याचे सांगत अध्यक्षपदावर दावा केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाच आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे महायुतीमधील वातावरण सध्या चांगलेच तापले असतानाच जि.प. अध्यक्ष व पंचायत समिती सभापती पदाच्या निवडीची तारीख जाहीर झाल्याने अध्यक्ष आणि सभापती निवडीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT