कोल्हापूर : औषध आणण्यासाठी जाणाऱ्या वृद्धाला रस्त्यात अडवून मारहाण करून खिशातील पंधराशे रुपये लुटल्याचा प्रकार सुभाषनगर येथील भरचौकात मंगळवारी दुपारी घडला. दादामियाँ अली बांगी (वय 70, रा. सुभाषनगर) असे जखमीचे नाव आहे. या घटनेनंतर संशयित रिक्षातून पसार झाला.
दादामियाँ बांगी हे दुपारी दीडला औषध आणण्यासाठी जात असताना अनोळखीने साई मंदिराजवळ त्यांना अडविले. त्याने विडीची मागणी केली. विडी नाही म्हटल्यानंतर संशयिताने पैशाची मागणी केली. वृद्धाने नकार देताच त्याना मारहाण सुरू केली. खिशातील पंधराशे रुपये जबरदस्तीने हिसकावून घेत तेथून रिक्षातून पलायन केले. शेखर नामक संशयिताने हे कृत्य केल्याचे नातेवाईकांतून सांगण्यात आले.