कोल्हापूर : दहावी-बारावीनंतर पुढे काय करायचे याबाबतचे प्रश्नचिन्ह विद्यार्थ्यांपेक्षा पालकांच्या चेहर्यावर जास्त दिसते. परीक्षा, निकाल व त्यानंतर प्रवेशाच्या चिंतेत संपूर्ण कुटुंब असते. अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यानंतर काय करायचे याचे तोकडे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळते. शिक्षकांचे ध्येय चांगले शिकवणे असते. परंतु, आज विद्यार्थ्यांना काय शिकायचे हे कोणी सांगत नाही. दै. ‘पुढारी’च्या वतीने गेली अनेक वर्षे सुरू असलेल्या ‘एज्यु-दिशा’ शैक्षणिक प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या करिअरला निश्चित चांगली दिशा मिळेल, असा आशावाद शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी व्यक्त केला.
दै. ‘पुढारी’ एज्यु-दिशा शैक्षणिक प्रदर्शनाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी थाटात झाले. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. प्रदर्शनाचे संजय घोडावत युनिव्हर्सिटी मुख्य प्रायोजक तर पॉवर्ड बाय प्रायोजक म्हणून पुणे येथील विश्वकर्मा युनिव्हर्सिटी आहेत. पुणे येथील एम. आय. टी. विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी व भारती विद्यापीठ प्रदर्शनाचे सहयोगी प्रायोजक आहेत. पीसीईटीज पिंपरी-चिंचवड युनिव्हर्सिटी, पुणे, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, पुणे, एम. आय. टी. ए. डी. टी. युनिव्हर्सिटी, पुणे व चाटे शिक्षण समूह सहप्रायोजक आहेत.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, दरवर्षी दै. ‘पुढारी’च्या वतीने विद्यार्थी व पालकांसाठी ‘एज्यु-दिशा’ शैक्षणिक प्रदर्शन हा उपक्रम राबविला जातो. एज्यु-दिशा शैक्षणिक प्रदर्शनात राज्यभरातील मोठ-मोठ्या संस्था सहभागी झाल्या आहेत. प्रदर्शनात विद्यार्थी व पालकांना तीन दिवस मार्गदर्शन मिळणार आहे. संजय घोडावत युनिव्हर्सिटीचे विश्वस्त विनायक भोसले म्हणाले, संजय घोडावत गेल्या अनेक वर्षांपासून दै. ‘पुढारी’ एज्यु-दिशा प्रदर्शनाचे प्रायोजक आहे, यापुढेही नेहमीच दै. ‘पुढारी’ समूहाबरोबर राहणार आहोत. जीवनात दिशा नसेल तर दुर्दशा व्हायला वेळ लागत नाही. विद्यार्थी व पालकांना योग्य दिशा मिळणे आवश्यक आहे. पालक विद्यार्थ्यांचे करिअर ठरवत असतात. म्हणूनच पालकांचे समुपदेशन करणे काळाची गरज बनली आहे. ज्या क्षेत्राची आवड आहे, त्यात विद्यार्थ्यांनी करिअर करायला हवे. पालकांनीदेखील मुलांना प्रोत्साहन दिले पाहिजे. सद्य:स्थितीत मुलगा जन्माला आल्यावर इंजिनिअर करायचे की डॉक्टर हे पालक ठरवतात, हे महत्त्वाचे नाही. विद्यार्थ्याला आवडत्या क्षेत्रात करिअर निवडण्यासाठी कसे प्रयत्न करावेत याचे पालकांनी मार्गदर्शन करावे. संजय घोडावत युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्रा. डॉ. उद्धव भोसले म्हणाले, राज्याच्या विविध भागांतील विद्यापीठे, शैक्षणिक संस्था नवनवीन कोर्सेस सुरू करीत आहेत. याची अद्ययावत माहिती ‘एज्यु-दिशा’ शैक्षणिक प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांना मिळणार आहे. या प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक दिशा ठरविताना मदत होणार आहे. दै. ‘पुढारी’चे मुख्य सरव्यवस्थापक अनिल पाटील यांनी आभार मानले.
यावेळी एमआयटी - विश्व प्रयाग युनिव्हर्सिटी, सोलापूरचे मार्केटिंग हेड अनुप सिंग, भारती विद्यापीठ, कोल्हापूरचे सहयोगी प्रा. डॉ. महेश पाटील, संजय घोडावत युनिव्हर्सिटीचे डेप्युटी डायरेक्टर अॅडमिशन मार्केटिंग अभिजित लाटकर, दै. ‘पुढारी’चे सरव्यवस्थापक (ऑपरेशन्स) राजेंद्र मांडवकर, संजय घोडावत युनिव्हर्सिटीचे डायरेक्टर अॅडमिशन मार्केटिंग राजेश वशीकर, चाटे शिक्षण समूह, कोल्हापूरचे विभागप्रमुख (अॅकॅडमिक) प्रा. सर्जेराव राऊत, विश्वकर्मा युनिव्हर्सिटी, पुणेचे डायरेक्टर अॅडमिशन डॉ. मकरंद पुरी, पीसीईटीज एन. एम. आय. ई. टी. तळेगाव, पुणेचे सहायक प्रा. डॉ. दिग्विजय पाटील, सहायक प्राध्यापक, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस, पुणेच्या सहायक प्रा. अस्मिता जोशी, एम. आय. टी - एडीटी युनिव्हर्सिटी, पुणेचे सहायक प्रा. डॉ. मंदार ब—ह्मे, भारती विद्यापीठ, कोल्हापूरचे सहायक प्राध्यापक प्रा. किर्ती कदम, अॅडमिनिस्ट्रेशन ऑफिसर वैशाली पाटील आदी उपस्थित होते.
धन असेल तर विल येते. धन आणि संस्कार असेल तर गुडविल निर्माण होते. आजच्या काळात गुडविल तयार करण्याचे काम शैक्षणिक संस्था करीत आहेत. आपण चांगले काय करतो हे सांगण्यासाठी शैक्षणिक संस्थांना ‘एज्यु-दिशा’सारखा प्लॅटफॉर्म मिळाला आहे. शैक्षणिक संस्थांनी एकमेकांना चांगल्या आयडिया शेअर करण्याची गरज आहे, तसेच चांगल्या शिक्षकांचेदेखील आदान-प्रदान होणे आवश्यक आहे, असेही संजय घोडावत युनिव्हर्सिटीचे विश्वस्त विनायक भोसले म्हणाले.
सकाळी 11 ते 12 :
वक्ते : विश्वकर्मा युनिव्हर्सिटी (पुणे) प्रवेश विभागाचे संचालक प्रा.डॉ. मकरंद पुरी. विषय : उच्च शैक्षणिक अभ्यासक्रमातील नवीन धोरणाचे फायदे
दुपारी 12 ते 12.30 :
वक्ते : सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टियूट, पुणेचे स्ट्रॅटेजी अँड डेव्हलपमेंट ऑफिसर नरेंद्र कुलकर्णी. विषय : उदयोन्मुख क्षेत्रात बारावीनंतरचे करिअर
सायंकाळी 5 ते 6 :
वक्ते : एमआयटी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी सोलापूरचे एमसीए प्रोग्राम हेड सहाय्यक प्रा.डॉ.दर्शन रूईकर. विषय : सर्व शैक्षणिक विद्या शाखासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स