Ex Deputy Mayor Office Raid
कोल्हापूर : हुपरी (ता. हातकणंगले) येथील एका चांदी व्यावसायिकाच्या कार्यालयावर ईडीने आज (दि.२१) छापेमारी केली. हुपरीचे माजी उपनगराध्यक्ष आणि चांदी व्यावसायिक भरतराव लठ्ठे यांच्या कार्यालयावर हा छापा टाकण्यात आला. यावेळी सुमारे पंधरा तास कार्यालयात झाडाझडती सुरू होती. २४ जूनरोजी मुंबईतील कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे. या कारवाई मागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान, राजकीय व्यक्तीच्या कार्यालयावर छापा पडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.