सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील ‘सरदार‌’ वाघ 
कोल्हापूर

Sahyadri Tiger Reserve : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात झाली पर्यावरणीय जीवनवाहिनी विकसित

व्याघ्र दिन विशेष : सात वाघांचा रोजचा प्रवास, पाणवठे, शिकार यांच्या महत्त्वपूर्ण नोंदी

पुढारी वृत्तसेवा

सागर यादव

कोल्हापूर : वाघाचा दररोज कोणत्या भागात किती प्रवास होतो, तो कोणत्या पाणवठ्यांवर पाणी पितो, शिकार कुठे व कोणत्या प्राण्यांची करतो यासह त्याच्या इत्थंंभूत हलचालींची माहिती संकलित झाली आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांना लावलेल्या सॅटेलाईट कॉलरच्या मदतीने त्यांच्या भ्रमंतीचा मागोवा घेतला जात आहे. कॅमेरा ट्रॅप सर्वेक्षण, क्षेत्रीय निरीक्षणे आणि जनुकीय अभ्यासांमधून या कॉरिडॉरमधील वाघांचा प्रवास आणि पश्चिम घाटातील व्याघ्र संख्येला परस्पर जोडणारी एक महत्त्वाची पर्यावरणीय जीवनवाहिनी विकसित झाल्याच चित्र आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात ४ नर आणि ३ मादी वाघांची भ्रमंती सुरू आहे. यापैकी तीन वाघिणींना (चंदा, तारा, हिरकणी ) सॅटेलाईट कॉलर लावण्यात आले होते. कॉलर लावल्यापासून ते काढेपर्यंत प्रत्येक वाघिणीच्या हालचालींची नियमित नोंद उपलब्ध झाली. जीपीएस स्थानांची माहिती आणि प्रत्यक्ष क्षेत्रीय निरीक्षण यांच्या आधारे त्यांच्या खाद्य निवडीचा अभ्यास करता आला. त्या कोणत्या प्राण्यांची सर्वाधिक शिकार करतात, शिकार झालेली ठिकाणे कोणती, तसेच त्यामागील अधिवासाची वैशिष्ट्ये समजून घेणे शक्य झाले. मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रत्येक वाघिणीची स्वतःची हद्द व त्यांची व्याप्ती, इतर वाघ- वाघिणींच्या हद्दींशी तिचे संबंध कसे होते यांचाही अभ्यास करण्यात आला आहे.

वाघिणींच्या मिलनाच्या नोंदी

निरीक्षणादरम्यान, तीनही वाघिणींचे वाघासोबत मीलन झाल्याचे उपलब्ध हालचालींच्या नोंदींवरून स्पष्ट झाले आहे. मात्र तिन्ही वाघिणींमध्ये गर्भधारणा झाल्याचे सूचित करणारी कोणतीही ठोस शारीरिक किंवा वर्तनात्मक लक्षणे आढळून आलेली नाहीत. त्यामुळे त्यांच्या गर्भधारणेबाबत सध्या निश्चित निष्कर्ष काढता येत नसल्याचे अभ्यासकांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT