कोल्हापुरात उद्यापासून दसरा महोत्सव. Pudhari File Photo
कोल्हापूर

कोल्हापुरात उद्यापासून दसरा महोत्सव

भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन; मोठ्या संख्येने सहभागी व्हा : जिल्हाधिकारी येडगे यांचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्हा प्रशासनाच्यावतीने दि. 3 ते दि. 12 ऑक्टोबर या कालावधीत ऐतिहासिक शाही दसरा महोत्सव आयोजित केला आहे. यानिमित्त दररोज विविध कार्यक्रम होणार असून त्यात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पत्रकार परिषदेत केले.

या महोत्सवाचे गुरूवारी (दि.3) सायंकाळी पाच वाजता पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते भवानी मंडप येथे उद्घाटन होणार आहे. या महोत्सवांतर्गत होणारे बहुतांशी सर्व कार्यक्रम भवानी मंडपातच आयोजित करण्यात आले आहेत. यामुळे बाहेरगावाहून आलेल्या भाविक, पर्यटकांना त्याचा लाभ घेता येणार आहे. या महोत्सवात सर्व घटकांना सामावून घेता येईल, यादृष्टीने कार्यक्रमांची रचना करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, माहिती अधिकारी वृषाली पाटील उपस्थित होते.

असे असतील कार्यक्रम...

गुरूवार दि.3 - छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ताक्षरीत दुर्मिळ पत्रसंग्रह व ऐतिहासिक ग्रंथांचे प्रदर्शन- मेन राजाराम हायस्कूल.

शुक्रवार दि.4 - नागरिक, शाळा, महाविद्यालये, शिवाजी विद्यापीठातील शिक्षक, विद्यार्थी, सर्व अधिकारी, कर्मचार्‍यांचा पांरपरिक वेशभूषा दिवस. पारंपरिक पद्धतीने फेटा बांधण्याचे प्रात्यक्षिक- भवानी मंडप, सर्व सावर्जनिक ठिकाणे, शाळा-महाविद्यालये, शासकीय कार्यालये.

शनिवार दि. 5- शालेय विद्यार्थ्यांसाठी कोल्हापूरची वारसा संस्कृती व सण परंपरा या विषयांवर चित्रकला स्पर्धा- सर्व शाळा, महाविद्यालये.

रविवार दि.6 - ‘महाराष्ट्राची शक्तीपीठे’ सांस्कृतिक कार्यक्रम, सायंकाळी 5 वा., भवानी मंडप.

सोमवार दि. 7 - 10 पथकांची युध्दकला प्रात्यक्षिक सादरीकरण व ‘गौरव माय मराठीचा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम, सायंकाळी 5 वाजता, भवानी मंडप.

मंगळवार दि. 8 - विविध क्षेत्रातील महिलांची ‘नवदुर्गा बाईक रॅली’, सकाळी 8 वा., दसरा चौक-बिंदू चौक- भवानी मंडप-टेंबलाई मंदिर-कावळा नाका-दसरा चौक.

बुधवार दि. 9 - पोलीस, मिलिटरी, शाळांसह इतर नामवंत पथकांचे बँड वादन. सायंकाळी 5.30 वाजता, भवानी मंडप.

गुरुवार दि. 10 - शालेय विद्यार्थ्यांसाठी कोल्हापूरची वारसा संस्कृती व सण परंपरा या विषयावर आधारीत निबंध स्पर्धा.

शुक्रवार दि.11 - श्री अंबाबाई नगरप्रदक्षिणा मार्गावर रांगोळी स्पर्धा.

शनिवार दि.12 - दसर्‍यानिमित्त शाही स्वारी; आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू, मर्दानी, मल्लखांब, ढोलवादन, लेझीम, झांज पथके, शिवकालीन वेशभूषेमधील मावळे-सांयकाळी 5 वा., भवानी मंडप ते दसरा चौक. 150 बुलेटस्वार, पोलीस एस्कॉर्ट व छत्रपतींच्या घराण्यातील वाहनांची रॅली. एन एस एस,

एनसीसी, स्काऊट गाईडचे विद्यार्थ्यांची मानवंदना- न्यू पॅलेस ते दसरा चौक.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT