कोल्हापूर : बाबुभाई परिख पुलाखालील अरुंद रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेतील चालकाची दुचाकी थेट रस्त्याकडील गटारात जाऊन उलटली.  (छाया : नाज ट्रेनर)
कोल्हापूर

kolhapur | बाबुभाई परिख पुलाखाली मद्यधुंद चालकाची दुचाकी थेट गटारात !

उघड्या गटारींमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; काही काळ वाहतूक कोंडी

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : बाबुभाई परिख पुलाखालील अरुंद रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत दुचाकी चालविणाऱ्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याची दुचाकी थेट रस्त्याकडील गटारात जाऊन उलटली. रविवारी रात्री घडलेल्या या प्रकारामुळे काही काळ पुलाखाली वाहतुकीची कोंडी झाली. १०८ रुग्णावाहिकेतून दुचाकीस्वाराला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना रविवारी रात्री ८ वाजून ४५ मिनिटांनी घडली.

परिख पुलाखालील रस्ता अरुंद असून एका बाजूला खोल गटार आहे. रात्रीच्या वेळी या मार्गावरून वाहनांची मोठी वर्दळ असते. अशातच एका मद्यधुंद अवस्थेतील चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी गटारात जाऊन उलटली. दरम्यान, पुलाखालील रस्त्यालगतच्या उघड्या गटारींमुळे वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT