Kolhapur Road Accidents | ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’मुळे कोल्हापुरात १० महिन्यांमध्ये ८ जणांचा बळी File Photo
कोल्हापूर

Kolhapur Road Accidents | ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’मुळे कोल्हापुरात १० महिन्यांमध्ये ८ जणांचा बळी

रस्ते असुरक्षित; ६०० दिवसांत ७०३ मृत्यू, अरूंद रस्त्यांमुळे कोंडी

पुढारी वृत्तसेवा

दिलीप भिसे

कोल्हापूर : वाहतूक नियोजनातील त्रुटी, अरूंद रस्ते अन्‌ वाहनाच्या अलोट गर्दीमुळे शहर, उपनगरासह जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांसह राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक असुरक्षित बनली आहे. जानेवारी २०२५ ते ऑक्टोबर २०२६ या ६०० दिवसांत शहर, जिल्ह्यात अपघाताच्या एकूण १,८०७ घटनांमध्ये ७०३ निष्पापांना प्राण गमवावा लागला आहे. तर ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’मुळे कोल्हापूर जिल्ह्यात १० महिन्यांत ८ जणांचे बळी गेले आहेत.

शिवाजी विद्यापीठ-शाहू नाका रोडवर रविवारी रात्री मद्यधुंद कार चालकाच्या बेफिकिरीची झळ सायबर चौकातील दोन कुटुंबांना सोसावी लागली आहे. ऐन उमेदीतील दोन निष्पाप तरुणांचा बळी गेल्याने अपघाताच्या वाढत्या घटनांमुळे शहर, जिल्ह्यात धीर-गंभीर चर्चा सुरू झाली आहे. शहरातील काही प्रमुख रस्ते वाहतुकीला धोकादायक ठरले आहेत. शिवाय शहरात अपघाताचे १६ ब्लॅकस्पॉट ठरल्याने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह प्रशासनाला वाहतूक सुधारण्यासाठी ठोस भूमिका घ्यावी लागणार आहे.

रोज तीन लाखांहून वाहनांची वर्दळ

कोल्हापूर शहरात रोज स्थानिक आणि परगावाहून येणाऱ्या सुमारे तीन लाखांवर वाहनांची वर्दळ असते. नवरात्रौत्सव, जोतिबा यात्रा, सुट्टी काळात भाविकांसह पर्यटकांची संख्या वाढते. यावेळी शहरातील बहुतांशी रस्ते वाहनांच्या गर्दीने फुललेले असतात. अरूंद रस्ते, वाहनांच्या गर्दीमुळे वाहतूकीवर त्याचा परिणाम जाणवतो. शहरातील संपूर्ण वाहतूक यंत्रणा विस्कळीत होते.

‘ड्रंक अँड ड्राईव्ह’च्या घटना टाळण्यासाठी बेधुंद अवस्थेत वाहने चालविणाऱ्याविरूद्ध शहर, जिल्ह्यात कठोर कारवाईची मोहीम राबविण्यात येणार आहे. शहरातील प्रमुख चौक, मार्गावर वाहनचालकांची तपासणी करण्यात येणार आहे. दोषीविरूद्ध गुन्हे दाखल करून न्यायालयात खटले दाखल करण्यात येत आहे.
नंदकुमार मोरे, पोलिस निरीक्षक (वाहतूक)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT