जोतिबा : पूजेत बाधा आणणार्‍या मद्यपींना चोप देताना भाविक, ग्रामस्थांसह पुजारी.  
कोल्हापूर

Jyotiba temple | मद्यपी भाविकांचा जोतिबा मंदिरात धिंगाणा

भाविक, देवस्थान कर्मचारी, पुजार्‍यांंना शिवीगाळ, मारहाण

पुढारी वृत्तसेवा

जोतिबा डोंगर : दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या मंदिरात सासनकाठी मानकर्‍यांसोबत आलेल्या काही मद्यपी तरुणांनी रविवारी मंदिरात धिंगाणा घातला. श्रींचा आरती सोहळा सुरू असताना सासनकाठीसोबत नाचणार्‍या दोन-तीन तरुणांनी श्रींच्या आरती सोहळ्यात अडथळा निर्माण करत पुजार्‍यांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार घडला. दरम्यान, परिते सरपंच व मानकर्‍यांनी चूक मान्य करत प्रकरण मिटवले.

रविवारी श्रींचा आरती सोहळा सुरू असताना परिते येथून आलेले मानकरी मंदिर आवारात सासनकाठी नाचवत होते. यावेळी त्यांच्यासोबत आलेल्या दोन तरुणांनी मंदिरात घुसून पुजार्‍यांसोबत वादावादी केली व आरतीत अडथळा आणला. देवस्थान समिती कर्मचार्‍यांच्या अंगावर धावून गेले. दरम्यान पुजारी, देवस्थान समिती कर्मचारी आणि मद्यपी तरुण यांच्यात धक्काबुक्की झाली. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT