Drug trafficking case | अमली पदार्थांसह उत्तेजक, घातक इंजेक्शनची तस्करी; तिघांना अटक 
कोल्हापूर

Drug trafficking case | अमली पदार्थांसह उत्तेजक, घातक इंजेक्शनची तस्करी; तिघांना अटक

विशेष पथकाचा छापा; 77 सीलबंद बाटल्या, गांजा हस्तगत

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : अमली पदार्थांसह शरीराला घातक मॅफेनटेरमाईन सल्फेट इंजेक्शनची तस्करी करणार्‍या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषणसह विशेष पथकाने विविध ठिकाणी छापा टाकून जेरबंद केले. स्वप्निल शशिकांत माने (30, रा. सदर बाजार), विनायक रवींद्र माने (23, रुईकर कॉलनी) व प्रज्वल दिनेश देवगिरीकर (27, 11 वी गल्ली, राजारामपुरी, कोल्हापूर) अशी त्यांची नावे आहेत.

स्वप्निल माने, विनायक माने यांच्याकडून मॅफेनटेरमाईन सल्फेट इंजेक्शनच्या 77 सीलबंद (कुपी) बाटल्यांसह इतर साहित्य असा 48 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. गांजा सेवनप्रकरणी देवगिरीकरला ताब्यात घेऊन राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले.

स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सुशांत चव्हाण, सहायक निरीक्षक शेष मोरे, विशेष पथकातील उपनिरीक्षक गिरीश शिंदे यांच्यासह पथकाने सदर बाजार, राजारामपुरी परिसरात छापा टाकून कारवाई केल्याचे अप्पर पोलिस अधीक्षक आप्पासाहेब जाधव, उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT