कोल्हापूर

Dr. Smita Jadhav : सहकारातून सामान्य आणि छोट्या व्यावसायिकांची प्रगती; डॉ. स्मिता जाधव यांच्याकडून कमर्शियल बँकेचे कौतुक

Pune Graduate Constituency Election : तरुणांच्या रोजगाराच्या संधींवर संवाद

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : सर्वसामान्य नागरिक, व्यापारी आणि लघुउद्योजकांच्या आर्थिक विकासाला खरी ताकद देण्याचे काम सहकार क्षेत्राने केले असून, त्यामध्ये ‘दि कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँक लि.’चे योगदान अत्यंत उल्लेखनीय आहे, असे गौरवोद्गार डॉ. स्मिता योगेश जाधव यांनी काढले. गुरुवारी (दि. १५) त्यांनी बँकेला सदिच्छा भेट देऊन संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांशी विविध विषयांवर संवाद साधला.

या सदिच्छा भेटीदरम्यान सहकारी बँकिंग क्षेत्रातील सद्यस्थिती, वेगाने होत असलेले डिजिटलायझेशन, अत्याधुनिक ग्राहकसेवा आणि या क्षेत्रात पदवीधर तरुणांसाठी निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या नव्या संधी यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर व मनमोकळी चर्चा झाली. तंत्रज्ञानाचा स्वीकार करत असतानाच सामान्य ग्राहकांशी असलेली नाळ घट्ट ठेवणाऱ्या बँकेच्या कार्यपद्धतीचे त्यांनी विशेष कौतुक केले.

याप्रसंगी बँकेचे चेअरमन अतुल शाह, व्हाईस चेअरमन शर्मिला कणेरकर, संचालक सुधीर कदम, संचालिका वैशाली शिंदे, असिस्टंट जनरल मॅनेजर पद्माकर जवळकर आणि आयटी विभागप्रमुख देवदत्त भोसले यांच्यासह बँकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते डॉ. स्मिता जाधव यांचे स्वागत करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT