Dr. Sanjay Oak Lecture today on the subject of 'Changes in the medical world'
'वैद्यकीय विश्वातील बदल' विषयावर डॉ. संजय ओक यांचे आज व्याख्यान Pudhari Photo
कोल्हापूर

'वैद्यकीय विश्वातील बदल' विषयावर डॉ. संजय ओक यांचे आज व्याख्यान

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

दै.'पुढारी' व डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने 'डॉक्टर्स डे' निमित्त डॉ. संजय ओक 'वैद्यकीय विश्वातील बदल' या विषयावर सोमवारी (दि. १ जुलै) ख्यातनाम डॉ. संजय ओक यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात डॉ. ओक मार्गदर्शन करणार असून, श्रोत्यांच्या प्रश्नांचे निराकरण करणार आहेत.

गेली २० वर्षे ही आरोग्य व्याख्यानमाला अविरतपणे सुरू आहे. यंदा व्याख्यानमालेचे २१ वे वर्ष आहे. व्याख्यानास डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप, कोल्हापूरचे अध्यक्ष डॉ. संजय. डी. पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

बदलती जीवनशैली, धावपळीचे जीवन, ताणतणाव, असंतुलित आहार, वाढती व्यसनाधीनता, इलेक्ट्रॉनिक गॅजेटचा अतिवापर कारणांमुळे रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, पुढारी अर्धांगवायू, कॅन्सर, निद्रानाश अशा विविध आजारांनी डोके वर काढल्याने दवाखाना, औषधांची दिवसेंदिवस वाढत आहे. गरज जगातील वैद्यकीय क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान, उच्च प्रणालीची वैद्यकीय साधनसामग्री, आजाराची व्यापकता यामुळे वैद्यकीय खर्च वाढत आहे. एकंदरीतच आरोग्याची काळजी घेण्यापासून आजारांना प्रतिबंध, निरोगी आरोग्य, पूर्वाश्रमीची वैद्यकीय सेवा, बदल हा निसर्गाचा नियम स्वीकारून तंत्रज्ञानातील बदलापासून डॉक्टर, रुग्ण, नातेवाईक यांच्यातील संवाद, रुग्णाकडे पाहण्याची दृष्टी, मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल व त्यांचे व्यवस्थापन, टेली, जनुकीय, नॅनो, डिजिटल, ड्रोनद्वारे उपचार पद्धतीबरोबर बायो सेन्सरयुक्त उपकरणे परिधान करणे, यात घड्याळ, चष्मा, कंबरपट्टा इत्यादींचा वापर करून रक्तदाब, शुगर, पल्सरेट, श्वसनगती अशा अनेक गोष्टींचे मापन, अचूक व वेळेत निदान व उपचाराकरिता होणारे फायदे यासह आरोग्य विम्याची निवड, शासनाच्या विविध आरोग्य योजना, कृत्रिम बुद्धिमत्ता (Al) यांसह भविष्यकाळातील आरोग्य व्यवस्था याविषयी मार्गदर्शन करून आपले आरोग्य सुदृढ ठेवण्याचा मूलमंत्र डॉ. संजय ओक देणार आहेत.

प्रवेश अग्रक्रमानुसार असून, या व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा, असे आवाहन व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. संदीप ज. पाटील यांनी केले आहे.

SCROLL FOR NEXT