कोल्हापूर : डॉ. संजय डी. पाटील यांना ‘द कॅप्टन्स व्हिजन अ‍ॅवॉर्ड’ने सन्मानित करताना रिचर्ड लिवसी. समवेत प्रवीण मित्तल, ॠतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, डॉ. राकेश कुमार शर्मा, डॉ. ए. के. गुप्ता, वृंदन जाधव आदी. 
कोल्हापूर

Dr. Sanjay D. Patil | कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांचा ‘द कॅप्टन्स व्हिजन अ‍ॅवॉर्ड’ने सन्मान

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : सिम्युलेशन आधारित वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील दूरद़ृष्टीपूर्ण व जागतिक स्तरावर प्रभाव निर्माण करणार्‍या कार्याबद्दल डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांना ‘द कॅप्टन्स व्हिजन अ‍ॅवॉर्ड’ने एलिव्हेट हेल्थकेअरचे आंतरराष्ट्रीय संचालक रिचर्ड लिवसी यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी ‘अ पार्टनरशिप बिल्ट ऑन व्हिजन’ हा पुरस्कारही प्रदान करण्यात आला.

‘सेलिबि—टिंग अ व्हिजन’ विशेष कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठाच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी डी. वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे प्र-कुलपती तथा विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता, एलिव्हेट हेल्थकेअरचे नॅशनल हेड प्रवीण मित्तल, डी. वाय. पाटील विद्यापीठ मुंबईचे प्रोजेक्ट हेड वृंदन जाधव आदी उपस्थित होते.

सत्काराला उत्तर देताना डॉ. संजय डी. पाटील म्हणाले, सिम्युलेशन आधारित शिक्षणामुळे आरोग्य क्षेत्रात काम करणारे विद्यार्थी, डॉक्टर्स यांना अधिक आत्मविश्वासाने उपचार करता येतात. भविष्यात जागतिक दर्जाच्या सुविधा व आधुनिक शिक्षणप्रणाली विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील. डॉ. शिंपा शर्मा यांनी प्रास्ताविक केले. कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, डॉ. नितीन सिप्पी, डॉ. संकेत पाटील, परीक्षा नियंत्रक अभय जोशी, श्रीलेखा साटम उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT