कोल्‍हापूर : दै. ‘पुढारी’चे मुख्‍य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव आणि सौ. गीतादेवी जाधव यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांच्‍या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांंजली वाहिली.  (छाया : पप्‍पू अत्तार)
कोल्हापूर

Dr. D. Y. Patil : डॉ. प्रतापसिंह जाधव, राज ठाकरे यांनी घेतले अंत्‍यदर्शन

अंत्‍यदर्शनासाठी विविध क्षेत्रांतील मान्‍यवरांची रिघ

पुढारी वृत्तसेवा

कोल्‍हापूर : पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्‍या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रांतील मान्‍यवरांनी त्‍यांच्‍या कसबा बावडा येथील निवासस्‍थानी अंत्‍यदर्शनासाठी गर्दी केली. दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, सौ. गीतादेवी जाधव, ‘पुढारी’ माध्‍यम समूहाचे संपादक डॉ. योगेश जाधव, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्‍यासह विविध क्षेत्रांतील मान्‍यवरांनी अंत्‍यदर्शन घेतले. मंगळवारी दिवसभर अंत्‍यदर्शनासाठी विविध क्षेत्रांतील मान्‍यवरांची रिघ लागली होती. यावेळी डॉ. संजय पाटील, आ. सतेज पाटील आणि कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्‍वन केले.

आ. चंद्रदीप नरके, आ. जयंत आसगावकर, माजी खासदार जयवंतराव आवळे, माजी मंत्री भरमुअण्णा पाटील, अण्णासाहेब डांगे, माजी आमदार महादेवराव महाडिक, संजय घाटगे, बाबासाहेब पाटील-सरूडकर, के. पी. पाटील, राजूबाबा आवळे, राजीव आवळे, जयश्री जाधव, सत्यजित पाटील-सरूडकर, माजी कुलसचिव डॉ. बी. पी. साबळे, शिवसेना उपनेते संजय पवार, ॲड. वीरेंद्र मंडलिक, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, आय.एस. टी.ई.चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह देसाई, ए. वाय पाटील, भैय्या माने, अर्जुन आबिटकर, गणपतराव पाटील, वैभव नायकवडी, कर्नाटकचे आमदार गणेश हुक्केरी, गगनबावडा पंचायत समितीचे सभापती छाया देसाई यांनी अंत्यदर्शन घेतले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, कर्नाटकचे उद्योगमंत्री एम. बी. पाटील, खासदार प्रणिती शिंदे, गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनीही पाटील कुटुंबियांचे फोनद्वारे सांत्वन केले.

बुधवारी (दि ५) डॉ. डी वाय पाटील यांच्या अंत्यदर्शनासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आमदार विजय वडेट्टीवार, आमदार अमित देशमुख, आमदार विश्वजित कदम, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार अंबादास दानवे, सचिन सावंत, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक, मनोज जरांगे-पाटील आदी उपस्थित राहणार आहेत

महादेवराव महाडिक यांच्याकडून सांत्वन

माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी मंगळवारी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. यानंतर डॉ. संजय डी. पाटील व आ. सतेज पाटील यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT