कोल्हापूर : पत्रमहर्षी पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव सहस्रचंद्रदर्शन सोहळा नागरी गौरव समितीच्या बैठकीत बोलताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर. डावीकडून बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. व्ही. आर. पाटील, वसंतराव मुळीक, आर. के. पोवार, उत्तम कांबळे, विजय देवणे, आमदार सतेज पाटील, ‘पुढारी’ माध्यम समूहाचे चेअरमन डॉ. योगेश जाधव, खासदार शाहू महाराज, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक, आमदार चंद्रदीप नरके, महेश जाधव, अ‍ॅड. महादेवराव आडगुळे, आदिल फरास, व्ही. बी. पाटील. 
कोल्हापूर

कोल्हापूरच्या जडणघडणीत डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे योगदान मोलाचे; पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे गौरवोद्गार

डॉ. जाधव यांचे ऋण फेडण्याची संधी : हसन मुश्रीफ

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी आपल्या मार्गदर्शनातून कोल्हापूरला नवी ओळख निर्माण करून दिली. कोल्हापूरच्या जडणघडणीत त्यांचे मोलाचे योगदान आहे. संपूर्ण महाराष्ट्राला कोल्हापूरची ओळख ‘पुढारी’मुळे झाली. त्यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा यापूर्वीच्या कोणत्याही कार्यक्रमांपेक्षा रेकॉर्ड ब्रेक झाला पाहिजे, अशी अपेक्षा कोल्हापूरचे पालकमंत्री व राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केली. कोल्हापूरचे अनेक प्रश्न दैनिक ‘पुढारी’च्या माध्यमातून डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी मार्गी लावले. त्यांचे हे उपकार कोणालाही विसरता येणार नाहीत. त्यांच्या या ऋणातून मुक्त होण्याची संधी त्यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यातून कोल्हापूरला मिळाल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

पत्रमहर्षी पद्मश्री डॉ. प्रतापसिंह ग. जाधव सहस्रचंद्रदर्शन सोहळा नागरी गौरव समितीची बैठक येथील धैर्यप्रसाद मंगल कार्यालयात रविवारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ बोलत होेते. अध्यक्षस्थानी खा. शाहू महाराज होते. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, सर्व पक्षांचे नेते आणि राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रांतील कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वर्षभर विविध उपक्रम

दैनिक ‘पुढारी’चे समूह संपादक डॉ. योगेश जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले व या सहस्रचंद्रदर्शन सोहळा कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. यापूर्वी झालेल्या सत्कार सोहळा समितीच्या बैठकीत सर्व उपस्थितांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केलाच आहे. त्याचे तपशीलवार नियोजन करण्यासाठी आजची ही बैठक आयोजित करण्यात आली असून, समिती सदस्यांच्या व कार्यकर्त्यांच्या सूचनांचा विचार करून त्याप्रमाणे कार्यक्रमांची आखणी केली जाईल. वर्षभर हा सोहळा साजरा करण्यात येणार असून, जम्मू-काश्मीर विद्यापीठासह देशातील सर्व नामांकित विद्यापीठांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

डॉ. जाधव यांनी कोल्हापूरची नवी ओळख निर्माण केली

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी हा कोल्हापूरच्या आनंदाचा सोहळा असल्याचे सांगून यापूर्वीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे तो लोकोत्सव व्हावा, यासाठी नियोजन करण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्राला कोल्हापूरची ओळख ‘पुढारी’मुळे झाल्याचे सांगून ते म्हणाले, कोल्हापूरच्या राजकीय, सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कृषी अशा सर्व प्रकारच्या क्षेत्रांत डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे योगदान मोलाचे आहे. त्यांनी विविधअंगी उपक्रमांतून आणि मार्गदर्शनातून कोल्हापूरची ही ओळख सर्वत्र निर्माण केली आहे.

उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा गौरव

अशा या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा सन्मान व गौरव तेवढ्याच उत्तुंग प्रकारे व्हावा, अशी अपेक्षा करून आबिटकर म्हणाले, यापूर्वी राजीव गांधी आणि नरेंद्र मोदी हे दोन पंतप्रधान या नात्याने दै. ‘पुढारी’च्या सोहळ्याला उपस्थित राहिले होते. त्या दोन्ही कार्यक्रमांपेक्षा हा सहस्रचंद्रदर्शन सोहळा रेकॉर्डब्रेक होईल, अशा तर्‍हेने साजरा व्हावा, यासाठी आपल्यावर दिलेली सर्व जबाबदारी पार पाडू. कारण, हा केवळ डॉ. प्रतापसिंह जाधव किंवा ‘पुढारी’ यांचा हा सोहळा नाही, तर तो आमच्यासारख्या ‘पुढारी’ परिवाराचा घटक असलेल्या सर्वांचा सोहळा असेल, असे आबिटकर म्हणाले.

आजच्या सोहळ्याच्या नियोजन बैठकीला उपस्थितांची गर्दी आणि व्यासपीठावरील लोकप्रतिनिधी व सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती पाहता हा कार्यक्रम किती भव्य प्रमाणात साजरा होईल, याची कल्पना येते, असे सांगून अध्यक्षीय समारोप करताना खा. शाहू महाराज यांनी कोल्हापूरच्या लौकिकाला साजेसा हा सोहळा होईल, यासाठी दोन राज्यांचे मुख्यमंत्री, संपूर्ण मंत्रिमंडळ, केंद्रीय मंत्री आणि सर्व पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत, हे या कार्यक्रमाचे आणखी एक वेगळेपण आहे.

लोकसोहळा होणार : शाहू महाराज

एकूणच सारे नियोजन पाहता हा सोहळा लोकसोहळा होईल आणि दै. ‘पुढारी’ आणि डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे कोल्हापूरच्या जीवनातील महत्त्वाचे योगदान अधोरेखित करणारे असेल. भव्य-दिव्य स्वरूपात हा सोहळा होणार, अशी खात्री असल्याचा विश्वास खा. शाहू महाराज यांनी व्यक्त केला.

डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे ऋण फेडण्याची संधी : हसन मुश्रीफ

पत्रमहर्षी पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा ‘न भूतो, न भविष्यति’ करण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे. यामध्ये कागल तालुक्यावर जी जबाबदारी टाकाल ती समर्थपणे पार पाडू, असे सांगून वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूरचा इतिहास लिहिला जाईल, त्यावेळी

डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे योगदान कोणालाही विसरता येणार नाही इतके भरीव काम त्यांनी कोल्हापूरसाठी केले आहे. राजर्षी शाहू छत्रपतींच्या विचारांचा आणि कार्याच्या प्रचार व प्रसाराबरोबरच कोल्हापूरच्या खंडपीठाचा प्रश्न असो किंवा टोल माफीचा प्रश्न असो, तो त्यांनी दै. ‘पुढारी’च्या माध्यमातून मार्गी लावला आहे. त्यांचे हे उपकार कोणालाही विसरता येणार नाहीत. त्यांच्या या ऋणातून मुक्त होण्याची संधी त्यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याच्या निमित्ताने कोल्हापूरवासीयांना मिळाली आहे. त्याचा लाभ उठवत डॉ. जाधव यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा लोकोत्सव करूया. त्यासाठी प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडावी.

भूमिपुत्राच्या गौरवासाठी कोल्हापूरकर उत्सुक : खा. माने

डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी दै. ‘पुढारी’ च्या माध्यमातून कोल्हापूरच्या अनेक प्रश्नांची सोडवणूक केली आहे. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रांत डॉ. जाधव यांचे योगदान कोल्हापूरकरांना ज्ञात आहे. अशा आपल्या भूमिपुत्राचा गौरव करण्याची संधी कोल्हापूरकरांना मिळाली आहे. या संधीचे सोने करण्यासाठी कोल्हापूरकर उत्सुकच नाहीत, तर सज्ज आहेत, अशा शब्दांत खासदार धैर्यशील माने यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

डॉ. प्रतापसिंह जाधव अनेक क्षेत्रांचे आधारवड

डॉ. जाधव यांच्याकडे कोल्हापूरकर विविध क्षेत्रांचा आधारवड म्हणून पाहतात. पंतप्रधानांपासून ते सरपंचांपर्यंत सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध जपत सामाजिक एकोपा राखण्याचे काम डॉ. जाधव आजही करीत आहेत. त्यांच्या या सर्वोच्च प्रतिमेला साजेसा गौरव समारंभ करूया, असेही खा. माने म्हणाले.

संपूर्ण कोल्हापूरचा सोहळा

डॉ. जाधव यांचा गौरव सोहळा त्यांचा अथवा ‘पुढारी’ परिवाराचा नसून समस्त कोल्हापूरकर या कार्यक्रमाकडे आपल्याच परिवारातील कार्यक्रम आहे, असे पाहत आहेत. त्यामुळे हा कार्यक्रम लोकसोहळा म्हणून साजरा होणार, असा विश्वासही खा. माने यांनी व्यक्त केला.

सोहळा देदीप्यमान व्हावा ः खा. महाडिक

कोल्हापूरच्या जडणघडणीत आणि विकासात डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे योगदान खूप मोठे आहे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक यांसारख्या सर्व क्षेत्रांत कोल्हापूरला वेगळी परंपरा आहे आणि ती जोपासण्याचे काम डॉ. जाधव यांनी केल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. हा सोहळा ‘न भूतो न भविष्यति’ असा देदीप्यमान झाला पाहिजे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असल्याचे ते म्हणाले. हा सोहळा संपूर्ण कोल्हापूरचा असून, शहरातून व जिल्ह्यातून घरटी एक माणूस या कार्यक्रमासाठी येईल, असे नियोजन करून त्याप्रमाणे सर्वांनी आपापली जबाबदारी पार पाडली पाहिजे, अशी सूचनाही धनंजय महाडिक यांनी केली.

डॉ. जाधव अनेक चळवळींचे बळ : प्रा. जयंत पाटील

प्रा. जयंत पाटील म्हणाले, दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव म्हणजे, संघर्षाचा धगधगता निखारा आहे. कोल्हापूरच नव्हे, तर महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय प्रश्नांची उकल करून त्यांनी ते प्रश्न सोडविले आहेत. सियाचीनच्या उत्तुंग रणभूमीवर सैनिकांसाठी दै. ‘पुढारी’ने सियाचीन हॉस्पिटल उभे केले. महापूर, भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये ‘पुढारी’च्या माध्यमातून निधी संकलित करून तो गरजू लोकांपर्यंत पोहोचवला. कोल्हापूरच्या थेट पाईपलाईन, सर्किट बेंचचा विषय मार्गी लावण्यासाठी वर्षानुवर्षे लढा देऊन चळवळ जिवंत ठेवण्याचे काम डॉ. जाधव यांनी केले आहे.

अशा उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा 80 वा वाढदिवस लोकोत्सव म्हणून साजरा करण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते सज्ज आहोत. प्रत्येकाला जबाबदारी वाटून द्या, त्या पद्धतीने ती आम्ही पार पाडू. येणार्‍या प्रत्येक पाहुण्यांची व्यवस्था चांगल्या पद्धतीने करूया. कोणाचीही गैरसोय होणार नाही, असेही प्रा. पाटील यांनी यावेळी सांगितले. विश्वराज जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

यावेळी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके, आमदार जयंत आसगावकर, आमदार अशोकराव माने, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, बार असोसिएशनचे अध्यक्ष व्ही. आर. पाटील, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, अ‍ॅड. महादेवराव आडगुळे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस महेश जाधव, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विजय देवणे, जिल्हाप्रमुख संजय पवार, क्रेडाईचे अध्यक्ष के. पी. खोत, आरपीयआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैया माने, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

सर्व खासदारांना ‘सिंहायन’ भेट देणार ः खासदार धनंजय महाडिक

डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी आपल्या पत्रकारितेच्या पाच तपाचा लेखाजोखा मांडलेल्या ‘सिंहायन’ या आत्मचरित्राचे यावेळी प्रकाशन होत आहे. 900 पानांचा हा ग्रंथ आहे. त्याचबरोबर सचिन खेडेकर यांच्या स्वरात त्याची डिजिटल आवृत्ती प्रसिद्ध होणार असल्याची माहिती आपल्याला देण्यात आली. देशातील लोकसभेचे 542 व राज्यसभेचे 253 अशा 795 खासदारांना आपण ‘सिंहायन’ या आत्मचरित्राची हिंदी आवृत्ती भेट स्वरूपात पाठविणार असल्याची घोषणाही धनंजय महाडिक यांनी केली.

डॉ. योगेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली ‘पुढारी’ समूहाची घोडदौड

डॉ. योगेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली दै. ‘पुढारी’सह टोमॅटो एफएम, पुढारी न्यूज चॅनल व डिजिटल माध्यमाची अतिशय चांगल्या पद्धतीने घोडदौड सुरू असल्याचेही हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

मान्यवरांची उपस्थिती

भाकपचे सचिव रघुनाथ कांबळे, आम आदमी पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई, मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष गणी आजरेकर, चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आनंद माने, माकपचे कॉ. चंद्रकांत यादव, प्रशासक कादर मलबारी, स्वामी विवेकानंद संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, अ‍ॅड. धनंजय पठाडे, अ‍ॅड. शिवाजीराव राणे, अ‍ॅड. अजित मोहिते, बार असोसिएशनचे लोकल ऑडिटर अ‍ॅड. प्रमोद दाभाडे, शेतकरी कामगार पक्षाचे बाबुराव कदम, उद्योजक जयेश ओसवाल, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे, शैक्षणिक व्यासपीठचे सभाध्यक्ष एस. डी. लाड, लॉरी ऑपरेटर असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव, कॉमन मॅन संघटनेचे अ‍ॅड. बाबा इंदूलकर, मध्यवर्ती सरकारी कर्मचारी संघटनेचे समन्वयक अनिल लवेकर, शिक्षक नेते भरत रसाळे, कोल्हापूर जिल्हा आरामबस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष सतीशचंद्र कांबळे, लोकराजा शाहू प्रतिष्ठानचे पै. बाबाराजे महाडिक, व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे, मेडिकल असोसिएशनचे डॉ. संदीप पाटील, आरोग्यदूत बंटी सावंत, माजी महापौर शिरीष कणेरकर, राजू शिंगाडे, माजी परिवहन सभापती सुनील मोदी, माजी उपमहापौर संजय मोहिते, माजी नगरसेवक अर्जुन माने, ईश्वर परमार, आर. डी. पाटील, संभाजी देवणे, बाबा पार्टे, दुर्वास कदम, अशोक भंडारे, रामदास भाले, भूपाल शेटे, भाजपचे विजय सूर्यवंशी, राजसिंह शेळके, सुनील पाटील, रमेश पुरेकर, उत्तम कोराणे, रघुनाथ टिपुगडे, महेश उत्तुरे, महेश जाधव, किरण नकाते, महेश सावंत, विजयसिंह खाडे, काँग्रेसचे विजय सूर्यवंशी, दिलीप पोवार, शिवाजी विद्यापीठ आजी-माजी विद्यार्थी कृती समितीचे डॉ. प्रवीण कोडोलीकर, राज्य मान्य खासगी शिक्षक महासंघाचे राजेंद्र कोरे, ब्लॅक पँथर पक्षाचे अध्यक्ष सुभाष देसाई, पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड, काँग्रेसचे विनायक घोरपडे, मल्हार सेनेचे बबन रानगे, स्वाभिमानी संभाजी बि—गेडचे रूपेश पाटील, जनशक्ती महासंघाचे दगडू भास्कर, सुरेश राजशील, धनंजय दुग्गे, मनसे परिवहन सेनेचे विजय करजगार, दळवीज आर्टस्चे प्रा. अजेय दळवी, ट्रॅक्टर मेकॅनिक असोसिएशनचे प्रकाश पाटील, दीपक गौड, अंनिसचे धीरज रुकडे, अविनाश दिंडे, जुना बुधवार तालमीचे अध्यक्ष रणजित शिंदे, विराज पाटील, सुशांत महाडिक, सुशील भांदिगरे, मराठा रियासतचे फत्तेसिंह सावंत, अनिल घाटगे, हिंदू युवा प्रतिष्ठानचे अशोक देसाई, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सीमा पाटील, गीता हासूरकर, वैशाली महाडिक, संजय क्षीरसागर, धान्य रेशन दुकान महासंघाचे डॉ. रवींद्र मोरे, छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळाचे अध्यक्ष अजित सासने, राजर्षी शाहू सेनेचे शुभम शिरहट्टी, युवा सेनेचे (ठाकरे गट) मंजित माने, शाहीर दिलीप सावंत, मराठा महासंघाचे अवधूत पाटील, जनशक्ती पक्षाचे बाळासाहेब भोसले, बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीचे किसन कल्याणकर, शिवराज जगदाळे, एस फॉर ए उजळाईवाडीचे राजू माने, नेताजी तरुण मंडळाचे अध्यक्ष राजू साळोखे, प्रिन्स क्लबचे अशोक पोवार, रमेश मोरे, शाहू अध्यासनचे प्राचार्य डॉ. जे. के. पवार, प्रा. डॉ. दिग्विजय पवार, ट्रॅव्हल असोसिएशनचे बळीराम वराडे, अश्किन आजरेकर, सदानंद दिघे, संपत पाटील, किशोर घाटगे, मधुसूदन सावंत, राजाभाऊ मालेकर, हणमंत नागटिळे, विकी कांबळे, प्रकाश पाटील, विलास भास्कर, रमेश पाचगावकर, शशिकांत कांबळे, विनायक पाटील, राहुल पाटील, संतोष पाटील, साताप्पा कांबळे, अमोल ओतारी, अनिकेत घोटणे, सोमनाथ बनछोडे, प्रभाकर पाटील, तानाजी लांडगे, रणजित देसाई, रोहित घोरपडे, करण कवठेकर, अमीर पठाण, लियाकत नालबंद, चंद्रकांत हिंदळकर, जयसिंग पाडळीकर, अविनाश शिंदे, प्रदीप मस्के, विजय पोळ, संभाजीराव पोवार, महेश राठोड, इम्तियाज मुल्ला, पीटर सय्यद, अजित कांबळे, ए. आय. बागवान, प्रवीण निगवेकर, प्रवीण आजगेकर, अजय हात्तेकर, गुणवंत नागटिळे, राहुल खाडे, अमर कदम, योगेश हातलगे, सुधीर फडके, राहुल कांबळे, ललित नवनाळे, अजय पाटील, सुरज वाघ, पतंग वाघ, रोहित डवरी, अमोल पाटील, अमोल मगदूम, संतोष कांबळे, सुधीर कांबळे, रणजित मिस्कीन, निखिल अतिग्रे, समीर ढोले-पाटील, समीर शिंदे, अमित शिंदे, धीरज शिंदे, तुषार शिंदे, सागर शिंदे, साहिल शिंदे, सम—ाट शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT