Dr. Jaysingrao Pawar | डॉ. जयसिंगराव पवार यांचे रक्षाविसर्जन पर्यावरणपूरक पद्धतीने 
कोल्हापूर

Dr. Jaysingrao Pawar | डॉ. जयसिंगराव पवार यांचे रक्षाविसर्जन पर्यावरणपूरक पद्धतीने

पाचगाव येथील शेतात आवडत्या आंब्याला रक्षा अर्पण

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : पुरोगामी विचारांचा वारसा जपत ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्या अंत्यसंस्कारानंतर त्यांचे रक्षाविसर्जन पाचगाव (ता. करवीर) येथील त्यांच्या शेतात करण्यात आले. डॉ. पवार यांना आवडत असलेल्या आंब्याच्या झाडाला त्यांची सर्व रक्षा अर्पण करण्यात आली. यामुळे पवार कुटुंबीयांनी डॉ. पवार यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा जपत पर्यावरणपूरक पद्धतीने शुक्रवारी रक्षाविसर्जन केले.

रक्षाविसर्जनास डॉ. पवार यांच्या कन्या प्रा. डॉ. मंजश्री पवार, प्रा. डॉ. अरुंधती पवार, मुलगा पृथ्वीराज पवार, नाती रिया व तारा पवार यांच्यासह नातेवाईक रणजित शिंदे, स्वाती कोरी, अनिल जाधव, पंडित कंदले, विशाल सावंत, सचिन घोरपडे आदी उपस्थित होते. दरम्यान, दिवसभर पवार कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी विविध क्षेत्रांतील मान्यवर व इतिहासप्रेमी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री आण्णासाहेब डांगे, हुतात्मा संकुलाचे प्रमुख वैभव नाईकवडी, इतिहास संशोधक डॉ. श्रीमंत कोकाटे, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष माधवराव मोहिते, शिवाजी विद्यापीठाच्या प्रकुलगुरू डॉ. ज्योती जाधव, पानिपतकार विश्वास पाटील यांच्यासह मान्यवरांचा समावेश होता. तसेच सोशल मीडियावर डॉ. जयसिंगराव पवार यांच्या संदर्भातील विविध पोस्टस्, आठवणी, छायाचित्रे, व्याख्यानांचे व्हिडीओ अशा माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजलीही वाहण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT