कोल्हापूर : डॉ. गायकवाड व शब्बीर हजारी यांच्याकडून ऑपरेशन थेटरमधून गर्भपाताची माहिती घेण्यात आली. 
कोल्हापूर

Illegal Abortions Case | डॉ. गायकवाड, मदतनीस शब्बीरने दाखवले गर्भपाताचे प्रात्यक्षिक!

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : चारशेहून अधिक गर्भपात करणाऱ्या डॉ. चंद्रकांत गायकवाड व त्याचा मदतनीस शब्बीर हजारी यांची गुरुवारी समोरासमोर चौकशी करून त्यांना कदमवाडी येथील प्रतिमा हॉस्पिटलमध्ये फिरवले. यावेळी या दोघांकडून हॉस्पिटलमधील ऑपरेशन थेटरमधून प्रत्यक्ष गर्भपाताची माहिती पोलिसांनी घेतली. शब्बीर दहावी नापास असूनही तो एका डॉक्टरप्रमाणेच सर्व सर्जरी करत असल्याची माहितीही तपासात समोर आली.

घर आणि हॉस्पिटल जुन्या काळातील

कदमवाडी येथे डॉ. गायकवाडचे दुमजली घर असून, तळ मजल्यावर हॉल, दोन बेडरूम, किचन आहे. तर बाहेरच्या बाजूला चौकशी कक्ष आहे. पहिल्या मजल्यावर हॉस्पिटल असून, तपासणी कक्ष, ऑपरेशन थिएटर, विश्रांती कक्ष, वॉर्डमध्ये तीन बेडची व्यवस्था आहे. रुग्णालयातील सर्व बेड, गादी, उशा पूर्णपणे जुन्या आणि धूळखालेल्या आहेत. केवळ ऑपरेशन थेटर आणि विश्रांती कक्षच स्वच्छ असल्याचे दिसून आले.

शब्बीर दहावी नापास पण...

डॉ. गायकवाडचा मदतनीस शब्बीर हा दहावी नापास असून, त्याने बॅचलर ऑफ इलेक्ट्रो - होमिओपॅथी मेडिसिन अँड सर्जरीची (बीईएमएस) पदवी घेतली आहे. शब्बीर एजंट, डॉक्टर अन् मदतनीस अशा सर्व भूमिका पार पाडत होता. ऑपरेशनची सर्व तयारीही शब्बीर करत होता. गर्भपातासोबत महिलांच्या इतर शस्त्रक्रियांबाबतही त्याला माहिती होती. शब्बीरला सुरुवातील २० ते २५ हजार पगार नंतरनंतर प्रत्येक शस्त्रक्रियेमागे कमिशन डॉ. गायकवाडकडून मिळत होते.

चेकबुक, पासबुक जप्त

पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह पथकाने गुरुवारी सायंकाळी सुमारे दोन तास डॉ. गायकवाडच्या घराची झडती घेतली. यामध्ये त्याच्या बँकेचे पासबुक, चेकबुक तसेच ठेवींच्या पावत्याही जप्त केल्या. याचसोबत काही औषधांच्या चिठ्ठ्या, पेशंटचे रिपोर्ट त्यांच्या हाती लागले.

मोबाईल नंबरसह केसपेपरवरही कोडवर्ड

डॉ. गायकवाड त्याच्या मोबाईलमध्ये विशिष्ट कोड वापरून नंबर सेव्ह करत होता. अशाच पद्धतीने तो संबंधित पेशंटच्या केसपेपरवरही कोडवर्ड लिहून ठेवत होता. गर्भपातासाठी आलेल्या महिलेचे नाव, पत्ता न लिहिता केवळ तारीख व वर्ष लिहीत होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT