कोल्हापूर : डी. वाय. पाटील ग्रुपचे संस्थापक, त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचा 90 वा वाढदिवस बुधवारी कौटुंबिक वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे प्रत्यक्ष भेटून व दूरध्वनीवरून अभीष्टचिंतन केले.
कसबा बावडा येथील त्यांच्या निवासस्थानी कुटुंबीयांनी औक्षण करून डॉ. डी. वाय. पाटील यांना निरोगी दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देत आशीर्वाद घेतले. त्यानंतर त्यांच्या हस्ते केक कापण्यात आला. यावेळी सौ. शांतादेवी डी. पाटील, डॉ. संजय डी. पाटील, आमदार सतेज डी. पाटील, राजश्री काकडे, डॉ. प्रिया चोलेरा, वैजयंती संजय पाटील, मेघराज काकडे, डॉ. प्रदीप पालशेतकर, पृथ्वीराज पाटील, वृषाली पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, देवश्री पाटील, करण काकडे, चैत्राली काकडे यांच्यासह सुना, जावई, नातसुना, जावई, नातवंडे-परतवंडे यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते.
खा. शाहू महाराज, ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, ‘पुढारी’चे समूह संपादक डॉ. योगेश जाधव, पुणे येथील डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार के. पी. पाटील, मानसिंगराव खोराटे, माजी कुलगुरू माणिकराव साळुंखे, डॉ. बी. पी. साबळे, डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सतीश पावसकर, चिमणराव डांगे, धैर्यशील पाटील, जयंत प्रदीप पाटील, डी. आर. मोरे, गोकुळचे संचालक बाबासो चौगले, शशिकांत पाटील-चुयेकर, किसन चौगले यांच्यासह सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला, क्रीडा, साहित्य, विविध क्षेत्रांतील मान्यवर तसेच डी. वाय. पाटील ग्रुपच्या विविध संस्थांचे अधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांना फोनद्वारे जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, डॉ. विजय डी. संदीप मुनोत, अभय कोटकर, विश्वास पाटील-आबाजी, स्वामी कीर्ती महाराज राजराजेश्वरी (बेंगळूर), गणेश नेर्लेकर महाराज, शिवहरी मोतीबाबा (वाराणसी) यांनी दूरध्वनीवरून डी. वाय. पाटील यांना शुभेच्छा दिल्या.