Kolhapur October Heat | कोल्हापुरात ‘ऑक्टोबर हीट’चा डबल अटॅक!  
कोल्हापूर

Kolhapur October Heat | कोल्हापुरात ‘ऑक्टोबर हीट’चा डबल अटॅक!

दिवसा उन्हाचे चटके अन्‌ उष्ण रात्रींमुळे नागरिक हैराण

पुढारी वृत्तसेवा

आशिष शिंदे

कोल्हापूर : दिवसा उन्हाचे चटके अन्‌ उष्ण रात्री असे चित्र कोल्हापुरात यंदाच्या ऑक्टोबर महिन्यात पाहायला मिळत आहे. ‘ऑक्टोबर हीट’ने यंदा दिवसा आणि रात्रीदेखील घाम फोडला आहे. ऑक्टोबर महिन्याच्या तापमान नोंदीत कमाल तापमान ३४.९ अंशांवर, तर किमान तापमान २४.१ अंशांवर पोहोचल्याने दिवसाबरोबर रात्रीही उष्ण झाल्या आहेत. त्यातच कधी ढगाळ वातावरण, तर कधी पावसाची हजेरी यामुळे हवामानाचा लहरीपणा वाढला आहे. उकाडा आणि बदलत्या हवामानाच्या या ‘डबल अटॅक’ चा परिणाम कोल्हापूरकरांच्या आरोग्यावरही दिसू लागला आहे. सर्दी, खोकला, ताप, नाक वाहणे आणि अंगदुखीच्या तक्रारी वाढत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

भारतीय हवामान विभागाच्या नोंदीनुसार, कोल्हापुरात ऑक्टोबर महिन्यात कमाल आणि किमान तापमानाचे विक्रमी टप्पे नोंदवले गेले. हवामान विभागाच्या १९७२ पासूनच्या नोंदींनुसार, १७ ऑक्टोबर २०२६ रोजी किमान तापमान २४.१ अंश सेल्सिअस नोंदले गेले. ऑक्टोबर महिन्यातील सर्वोच्च किमान तापमानाच्या प्रथम दहा नोंदींमध्ये हे चौथ्या क्रमांकाचे सर्वात जास्त किमान तापमान आहे. याच महिन्यात २ ऑक्टोबरला २३.६ अंश, तर ९ ऑक्टोबरला २३.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यावरून रात्री वाढलेली कमालीची उष्णता स्पष्ट होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT