कोल्हापूर

विधानसभा निवडणुकीत त्रुटी ठेवू नका : चंद्रकांत पाटील

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीतील त्रुटी विधानसभा निवडणुकीत ठेवू नका. आता जोमाने कामाला लागा, असा आदेश मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पदाधिकार्‍यांना दिला. भाजप कार्यालयात विचारमंथन बैठक झाली.

ज्या बूथवर मताधिक्य घेऊ शकलो तेथे अधिक मताधिक्य कसे मिळेल, जेथे कमी मतदान झाले तेथे कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील याची चर्चा झाली. चंदगड, कागल, करवीर, राधानगरी, कोल्हापूर उत्तर व दक्षिण या सहा विधानसभा मतदारसंघांची सकाळी दहा ते सायंकाळी पाचपर्यंत या बैठका घेतल्या. बैठकीस मकरंद देशपांडे, खा. धनंजय महाडिक, विक्रम पावसकर, महेश जाधव, समरजित घाटगे, विजय जाधव, राहुल चिकोडे, राहुल देसाई, सत्यजित कदम, अमल महाडिक, शौमिका महाडिक, भरमूआण्णा पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

शक्तीपीठासह समन्वयाच्या अभावावरही चर्चा

या बैठकीत माजी खा. मंडलिक यांच्या पराभवाची चिकित्सा करण्यात आली. जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गाबाबत जनतेतील नाराजीचा फटका, तर काही ठिकाणी समन्वयाचा अभाव दिसून आल्याची चर्चा झाल्याचे समजते. महायुतीत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप टाळावा. कोणावरही टिका टिपणी नको असे नेत्यांनी सुरुवातीस स्पष्ट केल्याचे सांगण्यात आले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT