kolhapur | गिरगावजवळ कुत्र्यांनी तोडले मृतदेहाचे लचके File Photo
कोल्हापूर

kolhapur | गिरगावजवळ कुत्र्यांनी तोडले मृतदेहाचे लचके

खुनाच्या अफवेने खळबळ

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूर - गारगोटी मार्गावरील गिरगाव फाट्यानजीक एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम पोलिसांनी सुरू केले असून, यासाठी परिसरातील मिसिंगची माहिती घेण्यात येत आहे. प्राथमिक तपासावरून हा मृतदेह कामगाराचा असून, १० ते १५ दिवसांपूर्वी तो मृत झाल्याची माहिती समोर आली.

कोल्हापूर - गारगोटी मार्गावरील गिरगाव फाट्यानजीकच्या झुडपात बुधवारी सकाळी ३० ते ३५ वयाेगटातील पुरुषाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळून आला. भटक्या कुत्र्यांनी मृतदेहाचे लचके तोडून मुख्य मार्गावर आल्यानंतर स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी याची माहिती करवीर पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

बांधकाम कामगाराचा मृतदेह ?

मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत होता. मृतदेहाच्या अंगात टी-शर्ट आणि गुडघ्यापर्यंत दुमडलेली पॅन्ट होती. त्याच्या दोन्ही पायातील चप्पल नजीकच पडले होते. यामुळे हा मृतदेह बांधकाम कामगाराचा असल्याचा संशय व्यक्त केला. फॉरेन्सिकच्या पथकाने काही नमुने ताब्यात घेतले आहेत. हा अपघात आहे की घातपात, हे तपासण्याचे काम सुरू आहे.

खुनाची अफवा अन् बघ्यांची गर्दी

कळंब्यात खून झाल्याची अफवा बुधवारी सकाळपासूनच पसरल्याने परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली. यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी काही वेळातच ही गर्दी पांगविली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT