कोल्हापूर : अतिरेकी संघटनांशी संबंध ठेवून फंडिंगचा आरोप करीत ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती घालून सायबर भामट्यांनी राजारामपुरी येथील डॉक्टर पिता-पुत्राकडून 42 लाख 91 हजार रुपये उकळल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. कुलाबा पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप रॉय बोलतोय, अशी बतावणी करून भामट्यांनी डॉ. शितोळे पिता-पुत्रांना गंडविले.
या कृत्याची पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी दखल घेतली असून सायबर भामट्यांची पाळेमुळे खणून काढण्याचे तपास यंत्रणांना निर्देश दिले आहेत. महेश्वर दत्तात्रय शितोळे (35, शितोळे हास्पिटल, राजारामपुरी पहिली गल्ली) यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तुम्ही दोषी आहात की निर्दोष याच्या पडताळणीसाठी तुम्हाला नॅशनल सिक्युरिटी प्रोटोकॉल सांभाळावा लागेल. या प्रकरणातून तुम्हाला बाहेर काढतो. पण यासाठी सर्व बँक खात्यांमधील रक्कम एका बँक खात्यात जमा करा, असे भामट्याने सुचविले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने 26 हजार, 30 हजार, त्यानंतर 21 ऑगस्टला 5 लाख 35 हजार रुपये आरटीजीएसद्वारे पाठविण्यास सांगितले. डॉ. शितोळे यांना संशय आला. त्यांनी मित्र दीपक सावंत यांच्याशी संपर्क साधला.
9 ऑगस्टला सायंकाळी कुलाबा पोलिस ठाण्यातून वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप रॉय बोलत असल्याचे सांगत तुमच्या नावाने मुंबईत एका बँकेत खाते असून त्यावर मनी लाँडरिंग होत आहे. तुमचे अतिरेकी संघटनांशी संबंध असून त्यांना फंडिंग केले जात आहे आणि त्याचे पुरावे सुप्रीम कोर्टात उपलब्ध आहेत.