kolhapur crime News | डॉक्टर महिलेवर लैंगिक अत्याचार करून लाखाच्या खंडणीची मागणी  
कोल्हापूर

kolhapur crime News | डॉक्टर महिलेवर लैंगिक अत्याचार करून लाखाच्या खंडणीची मागणी

नराधमाला अटक : व्हिडीओ व्हायरल करण्याचीही धमकी

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : पतीला भेटण्याच्या बहाण्याने बंगल्यात घुसलेल्या शाहूपुरी येथील नराधमाने डॉक्टर महिलेला अमानुष मारहाण करून जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना रविवारी उघडकीला आली. राजारामपुरी पोलिसांनी नराधम बिल्डर असलेल्या शक्ती विक्रम भोसले (35, रा. चौथी गल्ली, शाहूपुरी, कोल्हापूर) याला बेड्या ठोकल्या. न्यायालयाने त्याला 5 दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.

संशयिताने पीडित महिलेच्या घरात घुसून बळजबरी करताना मोबाईलद्वारे चित्रीकरणही केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित व्हिडीओ पीडित महिलेला पाठवून तो डिलिट करण्यासाठी एक लाखाची खंडणी द्यावी लागेल, अशी धमकीही दिल्याचे पीडित महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. महिलेची फिर्याद दाखल होताच राजारामपुरी पोलिसांनी संशयिताला तत्काळ अटक केली.

गुरुवारी (दि. 30) दुपारी 3.30 वाजता संशयित शक्ती महिलेच्या निवासस्थानी गेला. पतीला भेटण्यासाठी आलो आहे, असा बहाणा करून बंगल्यात प्रवेश केला. डॉक्टर सरबत करण्यासाठी स्वयंपाक खोलीत गेल्या. पाठोपाठ नराधमही स्वयंपाक खोलीत गेला आणि फरफटत बेडरूममध्ये नेत बळजबरी करून लैंगिक अत्याचार केला. प्रतिकार केला असता पतीसह दोघांना जीवे मारण्याची धमकी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT