Doctor Dies of Electric Shock | विजेच्या धक्क्याने डॉक्टरांचा मृत्यू 
कोल्हापूर

Doctor Dies of Electric Shock | विजेच्या धक्क्याने डॉक्टरांचा मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

हुपरी : अमावस्या असल्याने पूजनासाठी विद्युत मोटारच्या सहाय्याने चारचाकी धूत असताना विजेचा जोराचा धक्का लागून येथील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सागर शिवाजी गिरी (वय ४५, रा. छत्रपती शिवाजीनगर, हुपरी) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

शनिवारी अमावस्या व रविवारी घटस्थापना असल्याने घरातील स्वच्छतेचे काम सुरू होते. शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास डॉ. गिरी चारचाकी गाडी विद्युत मोटारच्या सहाय्याने धूत होते. यावेळी विजेचा जोराचा धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. डॉ. सागर हे समाजातील गोरगरीब कुटुंबातील महिलांवर माफक दरात उपचार करीत होते. गोरगरिबांचे डॉक्टर अशी त्यांची ख्याती होती. त्यांच्या मागे पत्‍नी, वडील व दोन मुले असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT