Diwali Holidays : दिवाळीत शाळांच्या सुट्ट्यांचा सावळा गोंधळ; प्राथमिक शाळांना दिवाळी संपल्यावर सुट्ट्या मिळणार! 
कोल्हापूर

Diwali Holidays : दिवाळीत शाळांच्या सुट्ट्यांचा सावळा गोंधळ; प्राथमिक शाळांना दिवाळी संपल्यावर सुट्ट्या मिळणार!

वेळापत्रकानुसार प्राथमिक शाळा मुख्य दिवाळीतच सुरु राहणार, प्रशासनाचा अजब निर्णय

पुढारी वृत्तसेवा

बांबवडे : ​दिवाळीच्या आनंदात आणि उत्साहात राज्यामधील शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभाराचा आणखी एक नमुना समोर आला आहे. माध्यमिक शाळांना गुरुवार ५ तारखेपासून सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत, तर प्राथमिक शाळांबाबत मात्र अजब आदेश समोर आले आहेत.

नियमानुसार आणि वेळापत्रकानुसार प्राथमिक शाळांना मंगळवार ९ तारखेनंतर म्हणजेच दिवाळीचा सण संपून गेल्यानंतर सुट्या मिळणार आहेत. विशेष म्हणजे, दिवाळीच्या मुख्य सणाच्या दिवशीच प्राथमिक शाळा सुरू ठेवण्याचा अजब निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

​सणासुदीच्या काळात विद्यार्थी आणि पालकांमध्ये या सावळा गोंधळाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. सणाच्या तोंडावर शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना नेमकी कोणती तारीख धरून चालावी, असा प्रश्न पडला आहे. माध्यमिक शाळा सुट्ट्यांवर जात असताना, प्राथमिक शाळांचे मात्र पाढे वेगळेच सुरू आहेत.

यामुळे दिवाळीच्या आनंदावर विरजण पडले असून, पालकांनी शिक्षण विभागाच्या या ढिसाळ नियोजनावर जोरदार टीका केली आहे. दिवाळी संपल्यावर मिळणाऱ्या या सुट्ट्यांचा नक्की काय उपयोग, असा सवाल संतप्त पालकांकडून विचारला जात आहे. प्रशासनाने या गोंधळाची तात्काळ दखल घेऊन सुधारित आदेश काढावेत, अशी मागणी जोर धरत आहे.

दिवाळी सुट्टीचा हा तिडा निर्माण झाल्याने परजिल्यात बाहेर जाणारे शिक्षक, कर्मचारी यांच्या समोर पेच निर्माण झाला आहे ऐन सणाच्यावेळी त्यांना सुट्टी असणार नाही त्यामुळे शिक्षण विभागाने याचा त्वरित विचार करावा, तसेच अन्य जिल्यात बुधवार पासूनच शाळा सुट्टी जाहीर केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT