कोल्हापूर

Lok Sabha Election 2024 : महायुतीचे जिल्ह्यातील नेते तातडीने मुंबईला

Arun Patil

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या हातकणंगले व कोल्हापूर या दोन्ही जागांचा तिढा बुधवारीही कायम राहिल्यामुळे जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक व खासदार धैर्यशील माने दोघेही मुंबईतच तळ ठोकून आहेत. त्यातच बुधवारी दुपारी महायुतीचे घटकपक्ष असलेल्या सर्व नेत्यांना मुंबईला बोलावण्यात आल्याने दुपारी ते रवाना झाल्यामुळे कोल्हापूरच्या दोन्ही जागांबाबतचा सस्पेन्स अधिकच वाढला आहे.

राजकारणामध्ये निवडून येण्याची क्षमता या निकषाबरोबरच विद्यमान खासदार, आमदार यांचा उमेदवारीसाठी प्राधान्याने विचार केला जातो. परंतु, कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही खासदारांच्या उमेदवारीबाबत निवडणुकीची चर्चा सुरू झाल्यापासून निर्माण झालेली संभ—मावस्था अजूनही कायम आहे. कोल्हापूरसह हातकणंगलेच्या जागेवर भाजपने दावा केला आहे. त्यामुळे खासदार माने व खासदार मंडलिक अस्वस्थ आहेत. महायुतीतील प्रमुख घटकपक्ष असलेल्या भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांची यादी मात्र अद्याप जाहीर होऊ शकली नाही.

या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच ठाणे येथील निवासस्थानी शिवसेनेच्या खासदारांची बैठक घेतली. या बैठकीस खा. संजय मंडलिक व धैर्यशील माने या कोल्हापूरच्या खासदारांसह राज्यातील खासदारही उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी विद्यमान खासदारांच्या उमेदवारीसाठी आग्रह कायम असल्याचे सांगितल्याचे समजते. मंगळवारी झालेल्या बैठकीत तोडगा न निघाल्यामुळे कोल्हापूरचे दोन्ही खासदार मुंबईत तळ ठोकून आहेत.

SCROLL FOR NEXT