कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन कार्यकारी मंडळ अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी यंदा कमालीची चुरस आहे. पदासाठी अॅड. विजय रामचंद्र पाटील (व्ही.आर.), अॅड. सतीश निवृत्ती कुणकेकर आणि अॅड. आनंदराव भाऊसाहेब जाधव यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अंतिम यादी सोमवारी (दि.28) प्रसिद्ध होणार आहे तर मतदान आणि मतमोजणी शनिवारी दि.3 मे रोजी होणार आहे.
उपाध्यक्षपदासाठी संदीप बाबुराव चौगुले, रेखा खाशाबा भोसले, तुकाराम शंकर पाडेकर. सेक्रेटरी पदासाठी सूर्यदीप मोहनराव भोसले, मनोज मोहन पाटील, प्रशांत कृष्णात पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. जाईंट सेक्रेटरी पदासाठी सुरज राजकुमार भोसले, अमोल नामदेव नाईक,रोहन संजय साळोंखे लोकल ऑडिटर पदासाठी प्रमोद प्रकाश दाभाडे, परवेज दिलावर पठाण, धीरज रंगराव शिंदे यांचे अर्ज दाखल झाले आहेत. महिला प्रतिनिधी पदासाठी दीपा बाबुराव गुरव, स्वाती प्रवीण मोहिते, मनीषा हिम्मतराव सातपुते रिंगणात उतरल्या आहेत.
कार्यकारिणी प्रतिनिधी पदासाठी रविना महादेव आदमापुरे, स्वप्निल सुनील कराळे, वैष्णवी विशाल कुलकर्णी, जयकुमार प्रवीण खटावकर, मिलिंद मारुती गुरव, स्नेहल भिमराव गुरव, शरदकुमार संभाजीराव चव्हाण, हंसिका अजित जाधव, हणमंतराव दत्तात्रय निकम- पाटील, रत्नदिप निर्मळे, शीतल नारायण पवार, वैभव रावसाहेब पाटील, राहुल राजाराम पाटील, सुस्मिता रमेश पाटील, प्रीतम श्रावण पातले.
मिना विद्यानंद पाटोळे, नीलेश ज्ञानदेव पोवार, चंद्रकांत लक्ष्मण पांडागळे, प्रतीक प्रदीप बोडेकर, जमीर पापालाल मुजावर, निखिल राजाराम मुदगल, तेजस्विनी विजय रणभिसे, मंजिरी प्रकाश राजगोळकर, सम—ाज्ञी युवराज शेळके, रविराज सुतार,भाग्यश्री नागेश स्वामी, दिनेश एस. सोनार्लीकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यामध्ये समावेश आहे. निवडणुकीत 2 हजार 923 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.