Kolhapur Airport | कोल्हापूरचा ‘उडान-२’ योजनेत समावेश होणार 
कोल्हापूर

Kolhapur Airport | कोल्हापूरचा ‘उडान-२’ योजनेत समावेश होणार

केंद्रीय मंत्री मोहोळ - आरोग्यमंत्री आबिटकर यांच्यात पुण्यात बैठक; कार्गो सेवेबाबतही चर्चा

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळाचा समावेश ‘उडान-२’ योजनेत करण्याबाबत शनिवारी पुण्यात केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि सार्वजनिक आरोग्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यात चर्चा झाली. या योजनेत कोल्हापूरचा समावेश करण्याचे स्पष्ट संकेत यावेळी देण्यात आले. यामुळे माफक दरात आणखी काही मार्गांवर कोल्हापूरकरांना विमानसेवा उपलब्ध होणार आहे.

कोल्हापूर विमानतळावरून हवाई मालवाहतूक सेवा सुरू करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. कोल्हापूर, इचलकरंजी, कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत तसेच पश्चिम महाराष्ट्रातील वस्त्रोद्योगासह इतर उद्योग, द्राक्षे आणि आंबा यासह कृषी आणि प्रक्रिया उद्योगांना हवाई मालवाहतुकीचा पर्याय उपलब्ध झाल्यास मालाची जलद वाहतूक शक्य होणार आहे. त्यामुळे औद्योगिक उत्पादने, निर्यातक्षम माल, तातडीची मालवाहतूक तसेच कृषी व प्रक्रिया उद्योगांतील उत्पादनांची जलद वाहतूक शक्य होईल. त्यातून कोल्हापूर विमानतळाच्या माध्यमातून उद्योग आणि व्यापाराच्या विस्ताराला नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी आबिटकर यांनी व्यक्त केला.

कोल्हापूर विमानतळाच्या सर्व प्रश्नांबाबत लवकरच प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी आणि सर्व लोकप्रतिनिधींची एकत्र बैठक कोल्हापुरात घेऊ, असे मोहोळ यांनी यावेळी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT