परवाना नसताना सीपीआरला शस्त्रक्रिया साहित्याचा पुरवठा  Pudhari File Photo
कोल्हापूर

न्युटन कंपनीच्या संचालकाला अटक

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : अन्न व औषध प्रशासनाचा परवाना नसताना सीपीआरला शस्त्रक्रियेसाठी साहित्य पुरवठा करणार्‍या अजिंक्य अनिल पाटील (वय 31, रा. राम गल्ली, त्रिमूर्ती कॉलनी, कळंबा) याला लक्ष्मीपुरी पोलिसांनी बुधवारी दुपारी अटक केली.

सीपीआरमध्ये विविध विभागांसाठी शस्त्रक्रिया करण्यासाठी सर्जिकल साहित्याची आवश्यकता असते. हे साहित्य न्युटन कंपनीकडून पुरवण्यात येत होते. यासाठी सीपीआर प्रशासनाने साहित्याचा पुरवठा होईल तशी बिलांची रक्कम कंपनीला दिली. ही रक्कम अंदाजे 9 कोटी रूपयांच्या आसपास होती. दरम्यान, शास्त्रक्रियेसाठी साहित्याचा पुरवठा करणार्‍या न्यूटन कंपनीकडे अन्न व औैषध प्रशासनाचा परवाना नसल्याचे निदर्शनास आले. यानंतर विविध संघटनांनी आंदोलन करून न्यूटन कंपनीच्या संचालकावर कारवाईची मागणी सीपीआर प्रशासनाकडे केली. यानंतर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गेल्या चार महिन्यापासून या कंपनीचा संचालक अजिंक्य पाटील अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करत होता. पण न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याने पाटील याला पोलिसांनी आज अटक केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT