Dahi Handi 2026 | महाडिक युवाशक्ती दहीहंडीचा ५ सप्टेंबर रोजी रंगणार थरार! File Photo
कोल्हापूर

Dahi Handi 2026 | महाडिक युवाशक्ती दहीहंडीचा ५ सप्टेंबर रोजी रंगणार थरार!

विजेत्या गोविंदा पथकाला ३ लाख, आठ थरांसाठी १ लाख विशेष बक्षीस

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : धनंजय महाडिक युवाशक्ती आणि भाजप यांच्या संयुक्‍त विद्यमाने शनिवारी (दि. ५) दुपारी ४ वाजता दसरा चौक येथे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी युवाशक्ती दहीहंडी स्पर्धा आयोजित केली आहे. विजेत्या गोविंदा पथकाला तीन लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

खासदार महाडिक म्‍हणाले, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्‍या हस्‍ते, मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्‍य नियोजन मंडळाचे कार्याध्‍यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक यांच्यासह लोकप्रतिनिधींच्‍या उपस्‍थितीत उद्‍घाटन होणार आहे. छायाचित्रण व रिल्स स्पर्धेसह खेळांडूंचा सत्कारही करण्यात येणार आहे. खासदार महाडिक म्‍हणाले, पाच थरांची सलामी देणाऱ्या पथकास पाच हजार, सहा थरांसाठी १० हजार, तर सात थरांसाठी १५ हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. आठ थर रचणाऱ्या गोविंदा पथकाला एक लाख रुपयांचे विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे. सर्व सहभागी पथकांना भागीरथी महिला संस्थेतर्फे फूड पॅकेट देण्यात येणार आहेत.

गोविंदांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना केली आहे. वैद्यकीय पथकांसह रुग्णवाहिकांची सोय आहे. गोविंदांना १० लाख रुपयांपर्यंत अपघाती विमा कवच मिळणार आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन महाडिक यांनी केले आहे. पत्रकार परिषदेस 'चॅनेल बी'चे व्‍यवस्‍थापकीय संचालक पृथ्‍वीराज महाडिक, नगरसेवक वैभव कुंभार, प्रमोद पाटील, विनोद कांबोज, सागर बगाडे, उत्तम पाटील, विजय टिपुगडे उपस्‍थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT