कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या चरणी भाविकांनी गेल्या एक महिन्यात 1 कोटी 40 लाख 61 हजार 865 रुपये देणगी स्वरूपात अर्पण केले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापनाच्या वतीने 12 दानपेट्यांतील देणगी मूल्याची मोजदाद शुक्रवारी (दि. 27) सायंकाळी पूर्ण झाली. गेल्या चार दिवसांपासून मंदिरातील अभिषेक मंडपात ही मोजदाद प्रक्रिया सुरू होती.
देवस्थान व्यवस्थापनाच्या वतीने मंदिरात 12 दानपेट्या ठेवण्यात आल्या आहेत. अंबाबाईच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांकडून या पेट्यांमध्ये रोख रक्कम देणगी मूल्य म्हणून अर्पण केले जाते. दर दोन किंवा तीन महिन्यांनी या देणगी मूल्याची मोजदाद केली जाते. सध्या मार्चअखेरीमुळे गेल्या एक महिन्यातील देणगी रक्कम मोजण्यात आली. पोलिस बंदोबस्तात 30 कर्मचार्यांच्याकरवी ही मोजदाद करण्यात आली.
पेटीनुसार देणगी मूल्याची मोजदाद
पेटी क्रमांक 1 : 27 लाख 14 हजार 256
पेटी क्रमांक 2 : 33 लाख 10 हजार 941
पेटी क्रमांक 3 : 1 लाख 62 हजार 767
पेटी क्रमांक 4 : 1 लाख 12 हजार 717
पेटी क्रमांक 5 : 2 लाख 17 हजार 757
पेटी क्रमांक 6 : 2 लाख 8 हजार 782
पेटी क्रमांक 7 : 28 लाख 60 हजार 425
पेटी क्रमांक 8 : 2 लाख 23 हजार 905
पेटी क्रमांक 9 : 1 लाख 9 हजार 144
पेटी क्रमांक 10 : 1 लाख 24 हजार 354
पेटी क्रमांक 11 : 33 लाख 903
पेटी क्रमांक 12 : 7 लाख 15 हजार 914