मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देताना गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ.  
कोल्हापूर

Gokul election | निवडणूक तत्काळ लावतो; महायुती म्हणूनच लढा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आदेश

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : गोकुळची निवडणूक प्रक्रिया तत्काळ सुरू करून महायुती म्हणूनच निवडणूक लढा, असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती चेअरमन नविद मुश्रीफ यांनी पत्रकाद्वारे दिली. तसेच गोकुळ संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत मंगळवारी झालेल्या बैठकीबाबत काही अफवा पसरविल्या जात आहेत, त्यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही मुश्रीफ यांनी केले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवडणूक प्रक्रिया तत्काळ सुरू करतो. विधिमंडळाने संमत केलेल्या नवीन कायद्याबाबतच्या अडचणी काय आहेत, याची माहिती दिली. यावर काय उपाय शोधता येतील, याबाबतही बैठकीत अनेक नेत्यांनी त्यांची मते सुचविली. यावर फडणवीस यांनी बुधवारी (दि.29) कायदेशीर सल्लागारांची बैठक घेऊन दोन्ही मुद्द्यांवर तोडगा काढतो. तुम्ही महायुती म्हणूनच निवडणूक लढवा, असा आदेश दिला. त्यामुळे बैठकीबाबत पसरविल्या जाणार्‍या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे. तसेच यासंदर्भातील निवेदनही मुख्यमंत्र्यांना दिल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT