कोल्हापूर : मुलींच्या आजारांची माहिती घेताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. सोबत खा. धैर्यशील माने, प्रशांत साळुंखे व रुग्णांचे नातेवाईक.  Pudhari File Photo
कोल्हापूर

उपमुख्यमंत्री शिंदे यांचा दोन आजारी मुलींना मदतीचा हात

कोल्हापूर दौर्‍यात औषधांसह उपचाराची जबाबदारी स्वीकारली

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : गंभीर आजारी असणार्‍या कोल्हापूर जिल्ह्यातील दोन मुलींना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी कोल्हापूर दौर्‍यावर असताना मदतीचा हात दिला. एका मुलीचे लिव्हर ट्रान्सप्लांट करायचे आहे, तर दुसर्‍या मुलीला चीनमधील महागड्या औषधांसह उपचारांची गरज आहे. रात्री विमानतळावर पोहोचल्यानंतर दोन्ही रुग्णांच्या नातेवाईकांना भेटून उपचाराची पूर्ण जबाबदारी शिंदे यांनी स्वीकारली आहे.

खा. धैर्यशील माने, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रशांत साळुंखे यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना दोन्ही मुलींच्या आजाराबाबत माहिती देऊन मदतीची मागणी केली. पोखले (ता. पन्हाळा) येथील श्रावणी शिवाजी पांढरे (वय 14) हिचे लिव्हर खराब झाले आहे. त्यामुळे तिची प्रकृती गंभीर बनली आहे. शस्त्रक्रियेसाठी सुमारे 17 लाख रुपयांची गरज आहे, तर हातकणंगले येथील ओवी सागर पुजारी ही एमएसपीई या दुर्मीळ आजाराने त्रस्त आहे. तिच्या उपचारासाठी चीनमधून तीन लाखांच्या इंजेक्शनची आवश्यकता आहे. त्याचबरोबर रुग्णालयातील दररोजचा खर्च 25 हजार रुपये आहे. ओवीचा एकूण सुमारे 15 लाख रुपये खर्च येणार आहे. या दोन्ही मुलींच्या उपचाराची जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT