Eknath Shinde Pudhari News Network
कोल्हापूर

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या जिल्हा दौऱ्यावर

गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत हुपरीतील कार्यक्रमाला लावणार हजेरी

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर :राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. सहपालकमंत्री माधुरी मिसाळही दौऱ्यावर येत असून राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील शनिवारपासून दोन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.

उपमुख्यमंत्री शिंदे यांचे रविवारी (दि. २०) दरे (जि. सातारा) येथून हेलिकॉप्टरने सकाळी १० वाजता कोल्हापूर विमानतळावर आगमन होईल. यानंतर ते शासकीय विश्रामगृहाकडे रवाना होणार आहेत. सकाळी ११ वाजता केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहा यांच्यासमवेत मोटारीने ते हुपरीकडे रवाना होणार आहेत. दुपारी दोन वाजता विमानतळावरून ते मुंबईला रवाना होणार आहेत.

नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या सहपालकमंत्री माधुरी मिसाळ याही रविवारी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. पुणे येथून सकाळी सहा वाजता त्या रवाना होतील. सकाळी दहा वाजता शासकीय विश्रामगृहावर त्यांचे आगमन होईल. यानंतर सकाळी ११ वाजता त्या हुपरीकडे रवाना होतील. यानंतर त्या नृसिंहवाडी येथे जाणार असून तेथून दुपारी साडेतीन वाजता त्या पुण्याकडे रवाना होणार आहेत. दरम्यान, राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील शनिवारी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. सायंकाळी पाच वाजता त्यांचे कोल्हापुरात आगमन होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT