कोल्हापूर : सकल मराठा समाजाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन जात पडताळणी विभागाला देण्यात आले. 
कोल्हापूर

kolhapur | कुणबी जात पडताळणीतील जाचक अटी दूर करा

सकल मराठा समाजाचे जिल्हा जात पडताळणी समितीला निवेदन

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : कुणबी जात पडताळणीतील जाचक अटी दूर करा. जुन्या एसईबी सीधारकांना कुणबी व्हॅलिडिटी द्या, या मागण्यांचे निवेदन सकल मराठा समाजातर्फे जिल्हा जात पडताळणी समितीला देण्यात आले.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कुणबी नोंदी सापडूनही प्रत्यक्ष जात वैधता प्रमाणपत्र (कॅस्ट व्हॅलिडिटी) मिळण्यात येणाऱ्या प्रशासकीय अडचणी दूर कराव्यात, तसेच पूर्वी एसई बीसी व्हॅलिडिटी घेतलेल्या नागरिकांना आता कुणबी व्हॅलिडिटी मिळण्याचा मार्ग मोकळा करावा, या मागण्यांचा समावेश निवेदनात आहे.

​ सन २०२३-२४ मध्ये न्यायमूर्ती (निवृत्त) संदीप शिंदे समितीच्या माध्यमातून राज्यभरात ५६ लाख, तर एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल १ लाख ४० हजार कुणबी नोंदी शोधण्यात आल्या. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणावर नोंदी उपलब्ध असतानाही जिल्ह्यातील अवघ्या १० टक्के नागरिकांनाही अद्याप कुणबी जात वैधता प्रमाणपत्र मिळालेले नाही. पडताळणी समितीकडून किरकोळ व तांत्रिक कारणांवरून प्रकरणांमध्ये त्रुटी काढल्या जात असल्याने ही प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे ही प्रक्रिया तत्काळ सहज, सुलभ आणि पारदर्शक करावी, या मागण्यांचा समावेश निवेदन आहे.

​संशोधन अधिकारी संभाजी पोवार यांनी निवेदन स्वीकारले. शिष्टमंडळात सकल मराठा समाजाचे समन्वयक वसंतराव मुळीक, रूपेश पाटील, चंद्रकांत पाटील, शशिकांत पाटील, विजय पाटील, सुनीता पाटील, सरदार पाटील, दिलीप सावंत, लता जगताप, मोहन सुर्वे, शंकरराव शेळके आदींचा समावेश होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT