कोल्हापूर : पावसामुळे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची व शेतकर्यांची सरसकट कर्जमाफीची आम्ही मेपासून मागणी करत आहे. त्यासाठी आता रस्त्यावरची लढाई करावी लागेल, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिला.
खासदार सुळे सोमवारी रात्री कोल्हापूर दौर्यावर आल्या आहेत. मंगळवारी सकाळी त्यांनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना, खरीप वाया गेल्यामुळे शेतकर्यांची अवस्था आता अतिशय वाईट आहे. गरज नसलेल्या शक्तिपीठ महामार्गावर 80 हजार कोटी खर्च करण्यापेक्षा शेतकर्यांची कर्जमाफी करावी, अशी मागणी त्यांनी केली. धनगर आणि मुस्लिम समाजाचे प्रश्न आम्ही सतत मांडत आहोत. मराठा समाजाच्या आरक्षणाला आम्ही पूर्ण पाठिंबा देतो; मात्र महाराष्ट्र सरकारने सर्वसमावेशक बिल आणले पाहिजे. त्याला साथ देऊ, असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, पद्मजा तिवले, अनिल घाटगे उपस्थित होते.
सरकारविरोधात बोलणार्यांना अजूनही जाते ईडी नोटीस
हैदराबाद गॅझेटचा नेमका उपयोग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट करावा
संस्कृती बचाव मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक घ्यावी
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली, तरी सरकार निर्णय घेत नाही