हुपरी : तळंदगे (ता. हातकणंगले) येथील बेघर वसाहतमधील विराज प्रदीप कुंभार (वय 7) या बालकाचा मृतदेह गुरुवारी गावातील विहिरीत आढळला.
विराज 2 ऑक्टोबर रोजी सकाळी घरातून निघून गेला होता. श्वान पथकाद्वारे मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी श्वान हे मलकारसिद्ध मंदिर येथील विहिरीजवळ जाऊन थांबले. काहींनी या मुलाला मंदिराजवळ पाहिल्याचे सांगितले. जलतरणपटू तानाजी मेटकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर व अंमलदार निवृत्ती माळी यांनी विहिरीत शोध घेतला असता मृतदेह सापडला.