कोल्हापूर : तावडे हॉटेल परिसरातील महापालिकेच्या कमानीचा धोकादायक भाग गुरुवारी महापालिकेने कटरच्या व इतर साधनसामग्रीच्या सहाय्याने उतरविण्यात आला. या कमानीला सध्या 27 वर्षे पूर्ण झाली असल्याने महानगरपालिकेच्या स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे. आता येत्या दोन दिवसांत भोवतालची अतिक्रमणे काढून वाहतुकीचे नियोजन करून संपूर्ण कमान उतरविली जाणार आहे.
एक जेसीबी, दोन डंपर व एका बुमच्या सहाय्याने अत्यंत धोकादायक असलेला भाग काढून टाकण्यात आला. कमानीच्या आतून गेलेली मुख्य विद्युत वाहिनीची केबल काढण्यात आली. शहरात येणारी मुख्य महामार्गावरील वाहतूक शहराच्या अन्य मार्गाने वळवावी लागणार आहे. तसेच या ठिकाणचे अतिक्रमण काढण्यात येणार असल्याने उर्वरित कारवाई पुढील दोन दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहे.
ही कारवाई सहा. आयुक्त कृष्णा पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता निवास पवार, स्ट्रक्चरल इंजिनिअर प्रशात आडकर, सहा. अभियंता अमित दळवी, कनिष्ठ अभियंता उमेश बागुल, सर्वेअर शाम शेटे, दत्ता पारधी व पोलिस कर्मचार्यांनी केली.