Dangerous Drug Seized | आरोग्याला घातक ठरणार्‍या नशेच्या इंजेक्शनचा साठा जप्त 
कोल्हापूर

Dangerous Drug Seized | आरोग्याला घातक ठरणार्‍या नशेच्या इंजेक्शनचा साठा जप्त

पोहाळेतील एकास अटक; मुंबई कनेक्शन उघड

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : आरोग्याला घातक ठरणार्‍या नशेच्या इंजेक्शनचा साठा शुक्रवारी हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी पोहाळे (ता. पन्हाळा) येथील धीरज आत्माराम मोटे (वय 32) यास अटक करण्यात आली. शहर पोलिस उपअधीक्षकांच्या पथकाने कसबा बावडा येथे सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतले.

त्याच्याकडून नशेच्या इंजेक्शनच्या 10 मि.लि.च्या 103 बाटल्या, मोबाईल, मोपेड असा 1 लाख 7 हजार 334 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याचे शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके यांनी सांगितले. धीरज याच्यावर यापूर्वी करवीर पोलिस ठाण्यात गुटखा वाहतूक व विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या तस्करीप्रकरणी मुंबईतील कनेक्शन असण्याची शक्यता आहे. संशयित धीरज मोटे हा नशेच्या इंजेक्शनची तस्करी करीत असल्याची माहिती शहर पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील यांच्या पथकाला मिळाली होती. पोलिस उपनिरीक्षक अभिजित इंगळे, हवालदार रोहित चौगुले, गौरव चौगुले, सोमनाथ पानारे याच्या पथकाने संशयितावर पाळत ठेवली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT