कोल्हापूर : कोल्हापूकरांना मनसोक्त खरेदीसोबत मौल्यवान व आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळवून देणार्या दै. 'पुढारी' टोमॅटो एफएम आयोजित शॉपिंग उत्सव 2023 ला सुरुवात झाली असून या योजनेत सहभागी दुकानातून खरेदी केल्यास भरघोस डिस्काऊंटसोबत ई-बाईक, सोेने व इतर बक्षिसे जिंकण्याची संधी आहे.
15 ऑक्टोबरपासून सुरू झालेला हा शॉपिंग उत्सव 30 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. या योजनेत सहभागी दुकानातून खरेदी करणार्या ग्राहकांना दै. 'पुढारी'चे एक कुपन दिले होते. हे कुपन भरून ग्राहकांनी दुकानात ठेवलेल्या ड्रॉप बॉक्समध्ये टाकायचे आहे. हे कुपन्स एकत्र करून त्यातून भाग्यवान विजेते लकी ड्रॉ द्वारे काढण्यात येणार आहे.
यामध्ये ई-बाईक, सोने, वॉशिंग मशिन, स्मार्ट फोन, यासह अनेक सरप्राईज बक्षिसे देण्यात येणार आहेत. तरी खरेदीसोबत बक्षिसे जिंकण्याची संधी मिळवण्यासाठी पुढारी शॉपिंग उत्सवात सहभागी दुकानातून खरेदी करा, असे आवाहन करण्यात येत आहे.