कोल्हापूरच्या रस्त्यावर आज स्त्री शक्तीचा हुंकार 
कोल्हापूर

Pudhari Kasturi Club : कोल्हापूरच्या रस्त्यावर आज स्त्री शक्तीचा हुंकार

दैनिक ‌‘पुढारी‌’ व कस्तुरी क्लबचा उपक्रम : दसरा चौकात शुभारंभ

पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर : गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या स्वागताचे औचित्य साधून महिलांचा आत्मविश्वास, आत्मनिर्भरता आणि आत्मसन्मानाचा गौरव करण्यासाठी दै. ‌‘पुढारी‌’ आणि ‌‘पुढारी कस्तुरी क्लब‌’च्या वतीने महिलांच्या भव्य बाईक रॅलीचे आयोजन रविवार, दिनांक 15 रोजी करण्यात आले आहे. सकाळी 7.30 वाजता ऐतिहासिक दसरा चौक मैदान येथून या रॅलीचा शुभारंभ होणार आहे.

या कार्यक्रमास कस्तुरी क्लबच्या अध्यक्षा डॉ. स्मिता योगेश जाधव, बालकल्याण समितीच्या सभापती कौसर बागवान, शहर पोलिस उपाधीक्षक प्रिया पाटील, रेवहेड यामाहाचे सौ. व श्री. सुमित दतवाडे, अगरवाल गोल्ड आणि सिल्व्हरचे सुशील आगरवाल, एचपी ग््रुापचे हिराकांत पाटील हे उपस्थित राहणार आहेत. या बाईक रॅलीचे मुख्य प्रायोजक अदानी समूह असून, सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेला आगरवाल गोल्ड अँड सिल्व्हरतर्फे हमखास मोत्याच्या कुड्या भेट देण्यात येणार आहेत. या रॅलीसाठी हिराकांत पाटील ग््रुाप हे हॉस्पिटॅलिटी पार्टनर आहेत. या रॅलीमध्ये हजारो महिला पारंपरिक वेशभूषेत मोठ्या उत्साहात सहभागी होणार आहेत किंवा ‌‘सफेद कुर्ता आणि जीन्स‌’ अशा पेहरावातही शहरातील नारीशक्ती सहभागी होत आहे. दै. ‌‘पुढारी‌’च्या वतीने आयोजित या रॅलीचे तिसरे वर्ष आहे.

मेकॅनिक्सचे सहकार्य

येथील टू व्हीलर मेकॅनिक्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने रॅलीमध्ये सहभागी दुचाकी दुरुस्तीची मोफत सेवा पुरवण्यात येणार आहे. रॅलीसोबत असोसिएशनची मेकॅनिक्सची टीम सुरुवातीपासून राहणार आहे. यामध्ये संजय पाटणकर, वैभव पाटणकर, प्रशांत साळोखे, प्रवीण देवकर, कृष्णात पाटील, संदीप पाटील, अभी पोवार या मेकॅनिक्सचा समावेश आहे.

... असा असेल रॅलीचा मार्ग

दसरा चौक येथून सुरू होणारी ही रॅली खानविलकर पेट्रोल पंप, कलेक्टर ऑफिस, धैर्यप्रसाद हॉल, ताराराणी चौक, व्हीनस कॉर्नर, लक्ष्मीपुरी पोलिस स्टेशन, बिंदू चौक, मिरजकर तिकटी, खरी कॉर्नर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महानगरपालिका, भाऊसिंगजी रोड आणि सीपीआर चौक मार्गे पुन्हा दसरा चौक येथे विसर्जित होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT