कोल्हापूर : गुढीपाडवा आणि मराठी नववर्ष स्वागताचे औचित्य साधून महिलांसाठी एक अनोखा आणि प्रेरणादायी अनुभव घेऊन येत आहे. दै. ‘पुढारी’, पुढारी न्यूज, टोमॅटो एफएम 94.3 आणि ‘पुढारी’ कस्तुरी क्लबच्या वतीने महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारी आणि स्त्रीशक्तीचा जागर करणारी भव्य बाईक रॅली रविवार, 23 मार्च रोजी सकाळी 7.30 वाजता कोल्हापुरात निघणार आहे. दसरा चौकातून सुरू होऊन 11 किलोमीटरच्या या रॅलीचा समारोप दसरा चौकातच होणार आहे.
या कार्यक्रमाचे ट्रॅव्हल पार्टनर अ हेवन हॉलिडे, राईड पार्टनर रेवहेड यामाहा, फूड पार्टनर हिराकांत पाटील्स एचपी हॉटेल असून, ऑक्सिरीच- कशिश ग्रुप यांनी विशेष सहकार्य केले आहे. कोल्हापूरसह सांगली, पुणे, ठाणे आणि अहिल्यानगरमध्ये एकाच दिवशी एकाच वेळेस महिलांची ही सशक्त रॅली निघणार असून, यामध्ये परंपरा आणि सक्षमतेचा संगम साक्षात अनुभवता येणार आहे. या रॅलीत शेकडो महिला पारंपरिक वेशात सहभागी होणार आहेत. लकी ड्रॉमध्ये कोल्हापुरातील एक आणि सांगलीतील एक कपलला अ हेवन हॉलिडेजच्या वतीने गोवा टूर देण्यात येणार आहे. सर्व सहभागी महिलांना दै. ‘पुढारी’तर्फे आकर्षक मानाचा फेटा दिला जाणार आहे (फक्त सकाळी 7.30 पूर्वी उपस्थित राहणार्यांना), चहा, अल्पोपहार, सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. ड्रेसकोड पारंपरिक वेशभूषा अथवा सफेद कुर्ता आणि जीन्स असा ठेवण्यात आला आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क ः 9423824997, 9923617769, 7498731912.
रॅलीत सहभागी होण्यासाठी प्रवेश विनामूल्य असून, सोबत दिलेला टठ कोड स्कॅन करून ऑनलाईन नोंदणी आवश्यक आहे. नावनोंदणीची अंतिम तारीख 21 मार्च आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपला सहभाग नोंदवावा. फक्त नोंदणी केलेल्यांनाच लकी ड्रॉमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
दसरा चौक-स्टेशन रोड-कावळा नाका-विद्यापीठ चौक- सायबरमार्गे माऊली पुतळा राजारामपुरी-शाहू मिल-सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमागे मिरजकर तिकटी-महाद्वार रोड-पापाची तिकटी-महानगरपालिका मार्ग-भाऊसिंगजी रोड-सीपीआर चौक-दसरा चौक.