कोल्हापूर : ओळख असल्याच्या बहाण्याने महिलेशी अश्लील वर्तन करणार्या पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार अमोल महादेव भास्कर (वय 32, मेनरोड जवाहरनगर) याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. याबाबतची माहिती राजारामपुरी पोलिसांनी दिली.
पोलिसांनी सांगितले की, अमोल भास्कर हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत. एका ओळखीच्या महिलेशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी संबंधित महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी त्याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. अधिक तपास राजारामपुरी पोलिस करत आहेत.