उजळाईवाडी : येथे बेकरीमध्ये केक नेण्यासाठी आलेल्या व्यक्तीवर तलवार हल्ला करून जखमी केले, तसेच मुख्य रस्त्यावर दहशत माजवणार्या आठ सराईत गुंडांवर गोकुळ शिरगाव पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. या संदर्भात हल्ल्यातील जखमी अनिकेत राजू काटे (28, रेणुका कॉलनी उजळाईवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.
अक्षय रामचंद्र पाटील (रा. उजळाईवाडी, सध्या रा. मणेरमळा), रोहन रुपेश पाटील व त्यांच्याबरोबर असलेले सहा साथीदार (नावे समजू शकले नाहीत) यांच्या विरोधात गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. यातील अक्षय पाटील याच्यावर 2020 मध्ये ‘मोका’ कारवाई अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्याचा परिसरामध्ये पुन्हा दहशत माजवण्याचा प्रकार सुरू आहे. त्याचा साथीदार रोहन पाटील याच्यावर गांधीनगर पोलिस ठाण्यात अनेक गुन्हे नोंद आहेत.